वर्धा : अंगणवाडीत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ देण्यासह इतर उपक्रमांची ऑनलाइन माहिती शासनाला तत्काळ पाठविण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्यात आले. मात्र, सध्या वाढत असलेल्या रिचार्जच्या दरांमुळे तब्बल २०० रुपयांचा भुर्दंड अंगणवाडी सेविकांना सहन करावा लागत आहे.
मोबाईल फोनची योजना अंमलात आली त्या काळापासूनच वादात सापडली आहे. अनेक संघटनांचा विरोध असताना शासनाने अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वर्ध्यात एक हजार २८१ मोबाईलचे वितरण करण्यात आले. हे मोबाईल देण्यात आले त्याच काळात त्याच्या रिचार्जसाठी सुद्धा ४०० रुपये देण्यात आले. यातून प्रारंभी काम चालत होते.
पण, गत वर्षभरापासून मोबाईल कंपन्यांनी रिचार्जचे दर वाढविले आहेत. पूर्वी ४०० रुपयांत मिळत असलेले रिचार्ज आत ५९९ रुपयांचे झाले आहे. शासनाच्या आदेशानुसार काम करण्यासाठी त्यांना ऑनलाइन असणे अनिवार्य झाले आहे. यामुळे जवळून २०० रुपये अतिरिक्त देऊन त्यांना मोबाईल रिचार्ज करावा लागतो.
हा भुर्दंड त्यांना दर तीन महिन्यांनी बसतो. यामुळे शासनाने ही रक्कम वाढवून देण्याची त्यांची मागणी असताना याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आयटकच्या वतीने करण्यात आला आहे. या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने या मोबाइलची शवयात्रा काढण्यात येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
अंगणवाडीची माहिती ऑनलाइन देण्याकरिता सेविकांना मोबाईल देण्यात आलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यांच्यात वारंवार बिघाड होत आहे. त्याची दुरुस्ती करणे परवडत नाही. यामुळे जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांचे मोबाईल बंद आहेत.
मोबाईलची शवयात्रा काढू
अंगणवाडी केंद्राच्या दैनंदिन कामकाजाची ऑनलाइन माहिती भरण्यासाठी देण्यात आलेला मोबाईल निकृष्ट आहे. शिवाय मोबाईल रिचार्ज करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना तीन महिन्यांसाठी ४०० रुपये देण्यात येतात. परंतु, रिचार्जचे दर वाढल्याने हे दर आता ५९९ रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे लवकरच आयटकच्या वतीने या मोबाईलची शवयात्रा काढू.
- दिलीप उटाणे,
राज्य उपाध्यक्ष, आयटक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.