Three sisters die of cooler shock 
विदर्भ

ब्रेकिंग न्यूज : कुलरचा शॉक लागून सख्या तीन बहिणींचा मृत्यू

राजेश काळे

राळेगाव (जि. यवतमाळ) : येथून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कोदुर्ली (श्रीरामपूर) येथील गजानन भुसेवार यांच्या सख्या तीन मुलींचा घरातील कुलरचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी आठ वाजता घडली. 

प्राप्त माहितीनुसार, गजानन भुसेवार व त्यांची पत्नी शेतात काम करण्यासाठी गेले होते. तिन्ही सख्या बहिणी घरी ऐकट्याच होत्या. रिया गजानन भुसेवार (वय आठ वर्षे), संचिता गजानन भुसेवार (वय सहा वर्षे) व मोना गजानन भुसेवार (वय चार वर्षे) या तिन्ही बहिणींना सकाळी जेवण करायचे होते. 

मोठी मुलगी रिया ही कुलमध्ये ठेवलेले अन्न घेण्यासाठी गेली. तिने कुलरला हात लावताच शॉक लागला. तिच्या मदतीसाठी संचिता व मोना धावत गेल्या. त्यांनाही शॉक लागला. घरात कोणीही नसल्याने काही वेळ त्यांचे मृतदेह घरातच पडून होते. या घटनेनंतर गावात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे. घटनेच्या ठिकाणी तहसीलदार डॉ. रवींद्र कानडजे, गटविकास अधिकारी रविकांत पवार व पोलिस उपनिरीक्षक दिलीप पोटभरे गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मदत करणे भोवले

मोठी बहीण जेवण आणण्यासाठी गेली असती तिला शॉक लागला. ती तजफळत होती. तिला काय झाले म्हणून पाहण्यासाठी दोन्ही बहिणी गेल्या. शॉक लागल्याचे समजताच दोन्ही बहिणींनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, हीच चूक भोनली. त्यांचाही शॉक लागल्यावे मृत्यू झाला.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rains Chaos: एका पावसात महाराष्ट्र ठप्प, १२ वर्षांचा हिशेब कोण देणार? सुप्रिया सुळे यांचा भाजप सरकारवर पर्यावरण व पायाभूत सुविधांबाबत जोरदार निशाणा

Manipur Attack: उग्रवाद्यांचा घातकी हल्ला! आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद; अनेक जण जखमी, मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा चिंताजनक

Pune Flood: इंद्रायणी नदीला पूर, वडगाव शिंदेत घरांत पाणी; १५ ते २० नागरिकांना अग्निशामक दलाने सुरक्षितस्थळी हलविले

Ram Mandir Trust: कोण आहेत कृष्ण मोहन? राम मंदिर ट्रस्टची जबाबदारी सांभाळणार; 'या' 10 मुद्द्यांवर बैठकीत चर्चा

Pune Rains: पुण्यात संततधार पावसाचा तडाखा; २४ तासांत ८३, सहा दिवसांत १६३ झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT