tiger attack
tiger attack tiger attack
विदर्भ

मोबाईलमधील गाणे ऐकून वाघोबाने ठोकली धूम; मुलाच्या हिमतीने वाचला जीव

सकाळ डिजिटल टीम

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : मागील काही दिवासांपासून चंद्रपूर जिल्ह्यात वाघांचे हल्ले वाढले आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत अनेकांचा जीव गेला आहे. तसेच तीन ते चार मुलांनाही वाघाने ठार केल्याचे मागील काही घटनेत घडले. असे असले तरी जंगलाच जाणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. कोणी चराईसाठी तर कोणी दुसऱ्या कामासाठी जंगलात जातच आहे. असाच एक अल्पवयीन मुलगा जंगलात शेळ्या चराईसाठी गेला होता. मात्र, मोबाईलमध्ये गाण वाजल्याने त्याचा जीव वाचला. अन्यथा वाघाने त्याला ठार (tiger attack) केले असते. गुणवंत असे या हिमती मुलाचे नाव आहे.

गुणवंत हा आवळगाव येथील महाराष्ट्र विद्यालयात नवव्या वर्गात शिकतो. सध्या शाळेला सुट्या असल्याने तो दररोज शेळ्या चराईसाठी जंगलात घेऊन जातो. १४ एप्रिल रोजी तो नेहमीप्रमाणे शेळ्यांना चरायला जंगलात घेऊन गेला होता. एका बाजूला शेळ्या चरत होत्या, तर काही अंतरावर गुणवंत मोबाईलवर गाणे ऐकत होता.

पहिले गाणे संपल्यानंतर दुसरे गाणे लावण्यासाठी तो खाली मान टाकून सर्च करीत होता. त्याचवेळी त्याच्यासमोर वाघ येऊन उभा राहिला. काही वेळाने त्याने मान वर केली असता चक्क वाघ (tiger attack) उभा दिसला. तो भीतीपोटी वाघाकडे आणि वाघ त्याच्याकडे पाहत होता. भयभीत झालेल्या मुलाला काहीही सुचत नव्हते. दरम्यान, त्याच्या मोबाईलमध्ये गाणे वाजायला सुरुवात झाली. गाण्याचा आवाज ऐकूण वाघ भांबावला अन् जंगलात धूम ठोकली.

गुणवंत होता जागेवरच उभा

वाघ पळत असल्याचे पाहून मुलाने मोबाईल फेकून मारला. तेव्हा मोबाईलमध्ये (Mobile) गाणे सुरू होते. गाणे ऐकून वाघ भांबावला असावा. त्याने सरळ जंगलाकडे धूम ठोकली. गुणवंत जागेवरच उभा होता. गुणवंतने दाखविलेल्या हिमतीने त्याचा जीव वाचला. गावात आल्यानंतर त्याने हा प्रकार घरातील सदस्यांसह गावकऱ्यांना सांगितला.

वन्यप्राणी-मानव संघर्षाच्या घटना नेहमीच्याच

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावे जंगलालगत आहेत. यातील अनेक गावांमध्ये वाघ, बिबट आदी वन्यप्राण्यांचा वावर आहे. परिणामी या तालुक्यात वन्यप्राणी-मानव संघर्षाच्या घटना घडत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT