Tiger
Tiger 
विदर्भ

वाघाने शिकार करून शेतकऱ्याच्या शरीराचे केले तीन तुकडे

सकाळवृत्तसेवा

मंगरूळ दस्तगीर (जि. अमरावती) - शेतात सायंकाळी साडेसहाला गेलेल्या एका शेतकऱ्याची वाघाने शिकार करून शरीराचे तीन तुकडे केले. सुरुवातीला शेतात केवळ पोलिसांना शेतकऱ्याचे मुंडके मिळाले. पोलिस व वनविभाग यांच्या १० तासांच्या शोधमोहिमेनंतर शनिवारी (ता. २०) सकाळी मृतदेहाचे लचके तोडलेले धड खोलाड नदीजवळ सापडले. तालुक्‍यातील मंगरूळ दस्तगीर येथील शेतशिवारात शुक्रवारी (ता. १९) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. 

राजेंद्र देवीदास निमकर (वय ४८), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. गावापासून आठ किमीवर निमकर यांचे शेत आहे. सायंकाळी ते शेतात गेले असता, रात्र होऊनही परत न आल्यामुळे त्यांचे चुलतभाऊ जिल्हा परिषद सदस्य सुरेश निमकर हे शेतात गेले. मात्र, शेतात राजेंद्र यांची अंडरविअर व बनियान दिसली. काही अंतरावर केवळ शिर दिसले. वाघाच्या पावलांचे ठसे दिसले. त्यानंतर पोलिस, वनविभाग यांच्या १० तासांच्या शोधमोहिमेनंतर शनिवारी सकाळी मृतदेहाचे लचके तोडलेले धड खोलाड नदीच्या एका कपारीत सापडले. शेतामध्ये माणूसभर कपाशी असल्याने शोध घेण्यास त्रास झाला. शोधमोहिमेत मंगरूळ दस्तगीरचे पोलिस निरीक्षक विवेकानंद राऊत, राहुल बोरकर, साहेबराव ठावरे, देवेंद्र नस्करी, धीरज राठोड, श्‍याम नाखले, गोपाल आसोले तर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशीष कोकाटे, के. बी. भांबुरकर, वाजगे, वाळके, कोहळे आदी सहभागी होते. दरम्यान, सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर यांनीसुद्धा भेट दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT