आयुध निर्माणीतील मागील परिसरात झुडपातून बाहेर पडताना वाघ. 
विदर्भ

शिकारीच्या शोधात वाघोबा भर वस्तीत!

सुनील पतरंगे

भद्रावती (जि. चंद्रपूर) - शिकारीच्या शोधात आलेल्या वाघाने शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बस स्थानकामागील मोकळ्या जागेत ठिय्या मांडला. आज दीड तासाच्या प्रयत्नानंतर त्याला जंगलाच्या दिशेने पिटाळून लावण्यात यश आले. त्यानंतर नागरिकांचा जीव भांड्यात पडला. दुसऱ्या एका घटनेत, जंगलात लाकडे आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले.

बस स्थानकाच्या मागे असलेल्या दूरसंचार विभागाच्या कार्यालयास लागूनच आयुध निर्माणीची झुडपी जंगलाची मोकळी जागा आहे. हा भाग ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागूनच असल्याने वन्यप्राणी येथे नेहमी येतात. काल रात्रीच्या सुमारास जंगलातून वाघ शिकारीच्या मागावर या भागात आला. त्याने याच भागात रानडुकरालाही ठार केले. डुकरावर ताव मारत असतानाच दिवस उजाडला. त्यामुळे तो या भागात अडकला. आज सकाळी फिरायला येणाऱ्यांना वाघ दिसला. लगेच बातमी शहरात पसरली. त्यामुळे त्याला बघण्यासाठी एकच गर्दी झाली. गर्दी व आजूबाजूच्या घरांमुळे वाघ चांगलाच गोंधळला आणि त्याने झुडपात आश्रय घेतला.

वनपरिक्षेत्राधिकारी स्वाती म्हैसकर, जिल्हा वनाधिकारी सोनकुसरे आणि वन विभागाचे "क्‍यूआरटी' पथक घटनास्थळी दाखल झाले. इको-प्रो, पोलिसांच्या मदतीने आधी बघ्यांना दूर सारण्यात आले. त्यानंतर फटाके फोडून वाघाला पिटाळून लावण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, घाबरलेला वाघ झुडपांतून बाहेर येत नव्हता. त्यामुळे अडचणी येऊ लागल्या होत्या. अखेर दीड तासाच्या प्रयत्नानंतर वाघाने जंगलाकडे पलायन केले व नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला.

महिला ठार
जंगलात लाकडे आणण्यासाठी गेलेल्या गीता सिडाम (वय 30) या महिलेवर आज वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली. गीता ही चिचपल्ली गावाला लागूनच असलेल्या हळदी येथील रहिवासी आहे. ती दुपारी लाकडे आणण्यासाठी जंगलात गेली होती. मात्र, बराचवेळ ती न परतल्याने तिच्या शोधात गावकरी जंगलाच्या दिशेने गेले असता, चिचपल्ली बफरझोन परिसरात तिचा मृतदेह दिसला. वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर मृताच्या कुटुंबीयाला आर्थिक मदत देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: सिंहगड ग्रामपंचायतीच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT