नागपूर : टी-थ्री वाघिणीचे शावक.  
विदर्भ

फेरीच्या कुटुबांने वाढविले गोठणगावचे आकर्षण

गुरुदेव वनदुधे

पचखेडी  (नागपूर)  : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या गोठणगाव प्रवेशद्वारावर सध्या पर्यटकांची चांगलीच गर्दी झाली आहे. अभयारण्यातील "टी-थ्री' वाघिणीने चार पिलांना जन्म दिला आहे. या चारही शावकासह वाघिणीचा मुक्तसंचार उमरेड-कऱ्हाडला अभयारण्याला भेट देणाऱ्यांसाठी आकर्षण ठरले आहे.
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील "जय' हा यापूर्वीच आशिया खंडातील सर्वांत मोठा आणि रुबाबदार वाघ म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आला होता. जयच्या दर्शनासाठी देश-विदेशातील विविध क्षेत्रातील सेलीब्रेटिंनी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याला भेटी दिल्या. जयच्या मृत्यूनंतर पर्यटकांचा ओघ कमी झाला. जयचे शावक असलेले बिट्टू व श्रीनिवास यांना पाहण्यासाठी पर्यटक येत होते.
मागील दोन महिन्यांपूर्वी अभयारण्यातील "टी-थ्री' (पूर्वीची टी-सिक्‍स) या फेरी वाघिणीने चार शावकांना जन्म दिला. अभयारण्याच्या गोठणगाव परिसरात तिचा चारही शावकासह मुक्त संचार सुरू आहे. हे शावक जयचे वंशज असू शकतात असेही मत वन्यजीवप्रेमी व्यक्त करीत आहेत. टी-थ्री वाघिण चार शावकासह जंगलातील पाणवठ्याच्या ठिकाणी हमखास पर्यटकांना दर्शन देत असल्याने वन्यप्रेमींचा ओघ वाढला आहे. अनेकदा गोठणगाव प्रवेशद्वारावर हाऊसफुल्ल असा बोर्ड लावण्यात येतो असेही मत स्थानिकांनी व्यक्त केले. अभयारण्यानजीकच्या अनेक गावात पर्यटकांच्या वाढीमुळे रोजगारांत वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT