toor and gram get good rate in amravati apmc 
विदर्भ

दोन आठवड्यांनी फुलला धान्य बाजार, तुरीला विक्रमी दर

क्रिष्णा लोखंडे

अमरावती : तब्बल दोन आठवडे बंद राहिलेली बाजार समिती गुरुवारपासून (ता. चार) नियमित सुरू झाल्याने शेतकऱ्यांसह अडते, खरेदीदार, हमाल व मापारी यांनी समाधान व्यक्त केले. धान्याच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू झाले असून तुरीला सात हजार, तर चन्याला चार हजार 950 रुपये प्रतिक्विंटल महत्तम भाव मिळाला. 

कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाउनमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्य बाजार बंद करण्यात आला होता. 21 फेब्रुवारीपासून बाजार बंद केल्या गेल्याने शेतकऱ्यांसह हमाल व मापाऱ्यांची मोठी अडचण झाली होती. खरिपातील तूर, सोयाबीन व रब्बी हंगामातील चना या शेतमालाची आवक यावेळी बाजारात चांगली होती. मात्र, तिला खीळ बसली. बाजार बंद झाल्याने आवक बंद होण्यासोबतच खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प पडून आर्थिक उलाढाल बंद झाली होती.

संचालक मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून कोरोना नियमांचे पालन करीत बाजार सुरू करण्याची विनंती केली. एक मार्चला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतर गुरुवारी (ता. चार) बाजार सुरू करण्यात आला. पहिल्याच दिवशी तुरीच्या 1352, सोयाबीनच्या 1854, चन्याच्या 5 हजार 889, गहू 189 व मुगाच्या सहा पोत्यांची आवक नोंदविल्या गेली. शेतकऱ्यांनी बाजारात आणलेल्या लाल तुरीला पहिल्या दिवशी 6550 किमान व 7 हजार रुपये कमाल भाव मिळाला. चन्यालाही हमीदराच्या तुलनेत चढे दर मिळाले असून 4500 ते 4 हजार 950 रुपयांना खरेदी झाली. मुगास सहा ते सात हजार व गव्हाला (लोकवन) 1800 ते 1950 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

बाजार उघडल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. बाजारातील शेतमालातील तेजी सध्यातरी कायम असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी थोडा पैसा पडू लागला आहे. बाजार सुरू करण्यापूर्वी उपसभापती नाना नागमोते, सहकार विभागाचे तालुका उपनिबंधक भुयार, पारिसे, पुरी, बाजार समितीचे सचिव दीपक विजयकर, सहसचिव भुजंग डोईफोडे यांनी कोरोना नियमांची माहिती सर्वांना दिली. मास्क बांधणे अनिवार्य असून निर्जंतुकीकरण व सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT