traders panic due to lockdown situation in amravati
traders panic due to lockdown situation in amravati 
विदर्भ

लॉकडाउनच्या भीतीने व्यापारी धास्तावले, सर्वसामान्यांची चिंता वाढली

सुधीर भारती

अमरावती : राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. कुठल्याही क्षणी लॉकडाउन जाहीर होणार, अशा विविध चर्चा समाजमाध्यमांतून होत असल्याने व्यापारी चांगलेच धास्तावले आहेत. लॉकडाउनची धास्ती सर्वसामान्यांमध्ये सुद्धा दिसून आली.  

अमरावतीमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याचे चित्र दिसून येत असले तरी राज्यस्तरावर मात्र कोरोनाचा मोठा उद्रेक होताना दिसतोय. अनेक जिल्हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले असून राज्यात कठोर निर्बंध लादण्याबाबत राज्य शासनाकडून गांभीर्याने विचार करण्यात येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शहरातील व्यापाऱ्यांमध्ये आतापासूनच चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.

जीवनावश्‍यक साहित्य वगळता अन्य व्यावसायिकांनी आगाऊ माल भरण्यास असमर्थता दर्शविली आहे. एकूणच लॉकडाउनच्या भीतीने आतापासूनच जनजीवन लॉक झाल्यासारखे चित्र दिसून येत आहे.  दरम्यान, शहरात कापडांची सध्या चांगलीच विक्री होत आहे. मात्र, पॅण्ट, शर्ट नव्हे तर घरातील वापरातील बमुर्डा आणि टी-शर्ट खरेदीकडे ग्राहकांचा जास्त ओढा दिसून येत आहे. लॉकडाउन लागले तर घरातल्या घरात हे कपडे वापरण्यास सोयीची असल्याने टी-शर्ट व बमुर्ड्याला चांगली मागणी आहे, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. 

मजुरांनी धरली गावची वाट -
अमरावतीत बिहार तसेच उत्तर प्रदेशातून परप्रांतीय कामासाठी वास्तव्यास आहे. प्रामुख्याने गाड्यांवर कापड विक्री करणे तसेच गुपचूपच्या व्यवसायामध्ये जास्तीत जास्त परप्रांतीयांचा समावेश आहे. मात्र लॉकडाउनच्या भीतीने मागील वेळी झालेले हाल पुन्हा होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून अनेकांनी आपल्या गावचा रस्ता धरला आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT