var1p35_c.jpg 
विदर्भ

पंचक्रोशी प्रदक्षिणेची परंपरा राहिली कायम,  पावणेदोनशे वर्षांचा इतिहास

सकाळ वृत्तसेवा

हिंगणी (जि.वर्धा) : विदर्भाची प्रती पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र घोराड येथे अखेर आषाढी एकादशीला निघणारी पंचक्रोशी प्रदक्षिणा पूर्ण झाली. यामुळे पावणेदोनशे वर्षाचा इतिहास जपण्यात देवस्थानच्या व्यवस्थापकांना यश आले. पहाटेपासून सकाळी सात वाजेपर्यंत भाविकांनी पायरीचे दर्शन घेतले. मंदिरात महापूजा करण्यात आली. यानंतर प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली. 

यानंतर पाच ते सहा वारकऱ्याच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता पंचक्रोशी प्रदक्षिणा करण्यास दिंडी निघाली. दोन किमी अंतराची असणारी ही प्रदक्षिणा टाळ-मृदंग निनादत माउली माउलीच्या जयघोषात सामाजिक अंतर ठेवत पूर्ण करण्यात आली. कोरोनामुळे मंदिर उघडण्याची परवानगी व दिंडीची परवानगी प्रशासनाने नाकारल्यानंतर गाव पातळीवर दोन दिवसांची संचारबंदी जाहीर केल्याने भाविकांना माउलीचे दर्शन दुरापास्त झाले. 

वाचा :- "आई प्लीज... तो बलात्कार नव्हे... प्रेम आहे आमचे' 

गावातील व परिसरातील भाविकांना माउलीच्या दर्शनाची असलेली आस मात्र कायम राहिली. तर दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना पोलिस बंदोबस्तामुळे पायरीवरही माथा टेकविता आला नाही. पण, परिसरात येऊन दुरूनच पायरीचे दर्शन घेता आले. पोलिस बंदोबस्त असल्यामुळे बहुतांश भाविकांनी घरीच माउलीची पूजा करून एकादशीची परंपरा कायम ठेवली. पंचक्रोशी प्रदक्षिणा झाल्याने संतांनी सुरू केलेली ही धार्मिक परंपरा खंडित झाली नसल्याचा आनंद भाविकांमध्ये दिसत होता. 

वारकऱ्यांची 22 दिवस प्रदक्षिणा 
घोराड ते पंढरपूर जाणारी दिंडी ही आळंदीवरून माउलीच्या पालखी सोहळ्यात सामील होत असते. या दिंडीचे हे सोळावे वर्ष होते. पण, दिंडी सोहळाच रद्द झाल्याने या दिंडीतील काही वारकऱ्यांनी 22 दिवस सकाळी व सायंकाळी मंदिर परीकोटला प्रदक्षिणा घालून 22 दिवस चालणारी पायदळ वारी पंढरीत नाही तर प्रती पंढरपुरात पूर्ण करून वारीची परंपरा कायम ठेवली. 

टाकळी येथील वयोवृद्ध वारकरी दशरथ चंदनखेदे यांनी मंदिर परिसरात वटवृक्षाच्या झाडाखाली बसून माउलीच्या भक्तीत तल्लीन झाले होते. पोलिसांनी या परिसरात भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून विशेष काळजी घेत भाविकांनी सहकार्य केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: एका वर्षात 1847 टक्के रिटर्न, हे आहेत 'ते' 5 स्टॉक; किंमत 100 रुपयांपेक्षाही कमी

गोव्यात रंगणार पहिली लिजेंड्स प्रो टी20 लीग; धवन, हरभजन, वॉटसन, स्टेनसह दिग्गज होणार सहभागी

Latest Marathi News Live Update :बदलापुरात एकाच घरातील सहाजणांना निवडणुकीचं तिकीट

Sangli Politics : "तासगाव पालिकेत पुन्हा भाजपची सत्ता! ‘सोशल इंजिनिअरिंग’सह भक्कम पॅनेल जाहीर करून महाडिकांचा विजयाचा दावा"

Bigg Boss Marathi 6 मध्ये दिसणार 'पिंकीचा विजय असो फेम अभिनेत्री? साऊथही गाजवलंय, नावाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT