kidnapped sakal
विदर्भ

Dhanora Crime : फिरत्या कपडे विक्रेत्याने अल्पवयीन मुलीला पळवले

एका अल्पवयीन मुलीला फिरते कपडे विक्रेत्यांनी पळवून नेल्याची घटना नुकतीच धानोरा येथे घडली.

सकाळ वृत्तसेवा

धानोरा - नववी उत्तीर्ण झालेल्या एका अल्पवयीन मुलीला फिरते कपडे विक्रेत्यांनी पळवून नेल्याची घटना नुकतीच धानोरा येथे घडली.

प्राप्त माहितीनुसार अर्चना (काल्पनिक नाव) असून ही मुलगी नुकतीच चालू सत्रात नववीची परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे. या मुलीचे सरासरी वय १४ वर्षे असल्याचे समजते. फिरते कपडे विक्रेत्याचे वय ५० वर्षाहून अधिक असल्याचे कळते. मात्र या व्यक्तीचे नाव पत्ता कुठल्याच ठिकाणी नोंद नाही. ही मुलगी दुपारच्या सुमारास सोमवार (ता. २७) दुपारी अंदाजे २ वाजतानंतर घरी कोणीच नसताना निघून गेली.

मुलगी कुठेतरी मैत्रीण व संबंधितांकडे गेली असेल ती सायंकाळपर्यंत येईल, असे आई-वडिलांना वाटले. मात्र सायंकाळची रात्र झाली तरी मुलगी घरी आली नाही. तेव्हा त्यांनी सर्वत्र शोध सुरू केला. त्यानंतर आई-वडील धानोरा पोलिस स्टेशनला गेले. पोलिसांनी तक्रार नोंद करून रात्रभर शोध घेतला. अखेर पोलिसाच्या संशयावरून ५० वर्षांहून अधिक असलेल्या कपड्या विक्रेत्यासोबत ही मुलगी पळून गेल्याचे समजले.

कपडे विक्रेते हे दोन ते तीन महिन्यापासून एका चाळीत भाड्याने राहात असल्याची माहिती पोलिस विभागाकडून प्राप्त झाली आहे. यापूर्वी या ठिकाणी तीन व्यक्ती राहत होते. मात्र दोन व्यक्ती काही दिवसांपूर्वीच आपल्या गावाकडे निघून गेले. हे सर्व उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याचे समजते. या प्रकरणी रात्रीपासून तपास चक्रे फिरवलेली आहेत.

पोलिसांच्या गुप्त माहितीनुसार चंद्रपुरात सोमवार (ता. २७)दोघेही दिसल्याची माहिती मिळाली आहे. ही माहिती मिळताच धानोरा पोलिस विभागातील पोलिस कर्मचारी चंद्रपूरकडे रवाना झाले आहेत. वृत्त लिहेपर्यंत कुठलाही पत्ता लागलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT