संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

बापरे! 39 जागांसाठी पडला अर्जांचा खच

सुरेंद्र चापोरकर

अमरावती : बेरोजगारीचा आकडा मोजण्यापलीकडे आहे. अशातच कोरोना संक्रमणात अनेकांचे असलेले रोजगारही बुडाले. त्यामुळे महापालिकेने काढलेल्या तात्पुरत्या व कंत्राटी नोकर भरतीवर अक्षरशः बेरोजगारांनी उड्या घातल्या आहेत. वैद्यकीय अधिकारी ते प्रयोगशाळा सहायक, अशा एकूण 39 पदांसाठी 1400 वर अर्जांचा खच महापालिकेत पडला आहे. हा आकडा बघून महापालिकेस अखेर मुलाखतीसाठी मुदतवाढ घ्यावी लागली.


कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर कोविड-19 अंतर्गत महापालिकेने वैद्यकीय अधिकारी, सहायक वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व सहायक, अशा पदांसाठी जाहिरात काढली आहे. चार ऑगस्टपासून मुलाखतींना प्रारंभ होणार होता. मात्र अर्जांचा खच बघून महापालिकेस आता मुलाखती 10 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलाव्या लागल्यात. कोविड 19 अंतर्गत कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर बाधित रुग्णांची वाढती संख्या बघता महापालिकेने आरोग्ययंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर सहा महिन्यांकरिता नोकरभरतीचा कार्यक्रम आयोजित केला. यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पाच जागांसाठी एमबीबीएस पात्रताधारकांकडून व 10 सहायक वैद्यकीय अधिकाऱ्यांकरिता बीएएमएस, बीयूएमएस व बीडीएस पात्रताधारकांकडून अर्ज मागविण्यात आले.

सोबतच सहा स्टाफ नर्स व आठ प्रयोगशाळा तंत्रज्ञांकरिता आवश्‍यक पात्रताधारकांकडून अर्ज मागविले. प्रयोगशाळा सहायकासाठी दहा जागा आहेत. सहायक वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी दोनशेवर आवेदकांनी अर्ज केले आहेत. तर स्टाफ नर्ससाठी दीडशेच्यावर इच्छुक आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञांचीही कमतरता नाही. दीडशेहून अधिक अर्ज या पदाकरिता आले आहेत. सर्वाधिक अर्ज प्रयोगशाळा सहायकासाठी आले असून त्यांची संख्या 900 पेक्षा जास्त आहे. अर्जांची संख्या बघता महापालिकेस मुलाखतीचा कार्यक्रम 10 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याची वेळ आली. ऑनलाइन आमंत्रित केलेल्या अर्जांच्या हार्डकॉपी काढण्यात महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभाग व्यग्र झाला आहे.

एमबीबीएस पात्रताधारक नाहीत
या नोकरभरतीत एकाही एमबीबीएस पात्रताधारकाने प्रतिसाद दिलेला नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पाच जागांसाठी एकही अर्ज आलेला नाही. त्यामुळे महापालिकेच्या नोकरीत या अर्हताधारकांना रस नसल्याचे अप्रत्यक्ष अधोरेखित होऊ लागले आहे.

संपादन - नरेश शेळके
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT