Truck-tanker accident nine killed Chandrapur-Mul road
Truck-tanker accident nine killed Chandrapur-Mul road  sakal
विदर्भ

अपघातानंतरच्या आगीत नऊ जणांचा होरपळून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : डिझेलचा टँकर आणि लाकडे वाहून नेत असलेल्या ट्रकमध्ये टक्कर होऊन झालेल्या अपघातानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतल्याने नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला. गुरुवारी (ता. १९) रात्री साडेदहाच्या सुमारास चंद्रपूर-मूल मार्गावरील अजयपूर गावाजवळ ही घटना घडली.लाकडे वाहून नेणारा ट्रक हा मूलमार्गे बल्लारपूरकडे जात होता. लाकडांच्या ट्रकमध्ये चालकासह सात मजूर होते. तर डिझेल भरलेला टॅंकर चंद्रपूरवरून मूलकडे येत होता. रात्री साडेदहाच्या सुमाराला अजयपूर गावाजवळ दोन्ही वाहनांची टक्कर झाली.

चालकांचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. टक्कर एवढी भीषण होती की, अपघातानंतर पाच मिनिटांतच दोन्ही ट्रकनी पेट घेतला. यामुळे ट्रकमध्ये बसलेल्या मजूर आणि चालकाला बाहेर निघण्यासही वेळ मिळाला नाही. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आत मजुरांच्या किंकाळ्या फक्त ऐकू येत होत्या. परंतु, आगीची तीव्रता बघून त्यांना वाचविण्यासाठी कुणीच समोर जाऊ शकले नाही. मदतीअभावी दोन वाहनचालकांसह सात मजुरांचा शेकडो नागरिकांच्या डोळ्यांदेखत जागीच होरपळून मृत्यू झाला. मृत व्यक्ती या बल्लारपूर, अमरावती आणि वर्धा येथील राहणाऱ्या होत्या.

रात्रीच चंद्रपूर येथील अग्निशमन दलाची वाहने पोहोचली. मात्र, तोपर्यंत काहीच शिल्लक नव्हते. ट्रकच्या सांगाड्याला लागलेली आग विझविण्याचे काम सकाळपर्यंत सुरू होते. आगीची झळ महामार्गावरील झाडांनासुद्धा बसून ती झाडेसुद्धा होरपळली. अपघातामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक केळझरमार्गे वळविण्यात आली. आज सकाळी चंद्रपूर-मूल मार्गाची वाहतूक सुरळीत झाली.

आर्थिक मदत द्या : मुनगंटीवार

या भीषण अपघातात मृत्‍युमुखी पडलेल्‍या नऊ व्‍यक्‍तींना तातडीने प्रत्‍येकी पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतून जाहीर करावे, अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍याकडे केली आहे. यासंदर्भात मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चाही केली. मुनगंटीवार यांनी रुग्णालयात जाऊन मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT