Two arrested for transporting liquor
Two arrested for transporting liquor 
विदर्भ

पोलिसांना मिळाली गुप्त माहिती; वाहनाची चौकशी केली असता आढळले हे...

सकाळवृत्तसेवा

यवतमाळ : अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दोन संशयितांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून चार लाख बारा हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई वणी तालुक्‍यातील रासा येथे करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार व त्यांचे पथक तपासासाठी वणी परिसरात होते. सुभाष शिंदे नावाचा व्यक्ती वाहनाने गोकुळनगर परिसरातून देशी दारूचा माल घेऊन दीपक टॉकीज, दीपक चौपाटीमार्गे रासा येथे जाणार आहे, अशी गोपनीय माहिती पोलिस पथकाला मिळाली. त्यानंतर जिंदमवार व पथकाने दीपक टॉकीज परिसरात सापळा रचून गोकुळनगर परिसरातून दीपक टॉकीज चौकाच्या दिशेने माहितीप्रमाणे येणाऱ्या शर्वेलेट वाहनाला थांबवून पाहणी केली. वाहनात चालक सुरेश नग्बू टेकाम (वय 27, रा. रासा) व सोबतचा व्यक्ती सुभाष प्रकाश शिंदे (वय 24, रा. रासा) असे दोघे आढळून आले.

पंचांसमक्ष त्यांच्या ताब्यातील वाहनाची झडती घेतली असता वाहनाच्या डिक्‍कीत देशी दारूने भरलेले पुठ्ठ्यांचे पाच बॉक्‍स ज्यामध्ये 180 मिली क्षमतेच्या 250 बॉटल एकूण किमत 12 हजार 480 रुपयांचे आढळून आले. हा दारूसाठा व चार लाख रुपयांचे वाहन असा एकूण चार लाख 12 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून वरील दोन्ही संशयितांविरुद्ध पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर अधीक्षक नुरुल हसन, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्य मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, गजानन डोंगरे, उल्हास कुरकुटे, किशोर झेंडेकर, दत्ता दुमारे व वणी पोलिस ठाण्यातील विठ्ठल भुरेवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT