Dishant-and-Sujal
Dishant-and-Sujal 
विदर्भ

आमनदीत पोहायला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

सकाळवृत्तसेवा

मांढळ - नजीकच्या वग-विरखंडी येथील आमनदीच्या पात्रात पोहायला गेलेल्या दोन किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. सुजल रामकृष्ण डहाके (वय १४) व दिशांत किशोर शास्त्रकार (वय १४, दोघेही रा. वग) अशी मृतांची नावे आहेत. 

बुडून मृत्यू झालेली दोन्ही मुले वग येथील बालाजी पाटील हायस्कूलचे इयत्ता आठवीचे विद्यार्थी आहेत. मंगळवारी मांढळचा बाजार असल्याने शाळेला लवकर सुटी देण्यात आली होती. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वग येथील सहा मित्र आमनदीच्या पात्रात पोहायला गेले होते. पोहत असताना सुजल व दिशांत नदीच्या धारेला लागले. तग धरता न आल्याने नदीच्या धारेतील डोहात बुडाले. यानंतर सोबतच्या मुलांनी गावाकडे पळ काढला. नदीपात्राकडून परतणाऱ्या शेतमजूर महिलांना नदीकाठावर मुलांचे कपडे व सायकली पडून दिसल्या. त्यांनी गावकऱ्यांना ही माहिती दिली. माहिती मिळताच गावकऱ्यांनी नदीकडे धाव घेतली. काही युवकांनी नदीत उतरून शोध घेतल्यावर डोहातील गाळात दोघांचे मृतदेह आढळून आले. दरम्यान, कुही पोलिसांना माहिती देण्यात आली. कुहीचे ठाणेदार जगदीश गायकवाड व सहायक पोलिस उपनिरीक्षक द्वारकानाथ गोंदके चमूसह घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मुलांच्या मृतदेहाचा पंचनामा करून दोघांचेही प्रेत उत्तरीय तपासणीसाठी कुही येथे पाठविण्यात आले.

गावात शोककळा 
सुजल एकुलता मुलगा आहे तर दिशांत त्याचे मामा हिंगणकर यांच्याकडे राहत होता. दोन्ही मुले अभ्यासात हुशार होती. मागील पंधरवड्यातच त्याचे मामा व आजोबा मरण पावले होते. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: यश दयालने गुजरातला दिला दुहेरी दणका! राशिद खानपाठोपाठ तेवतियाही बाद

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT