file photo
file photo 
विदर्भ

पिकअपच्या धडकेत माय-लेक ठार

सकाळ वृत्तसेवा

रामटेक (जि. नागपूर)  : भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज मंगळवारी दुपारी रामटेकनजीकच्या दुधाळा येथे घडली. अपघातानंतर रामटेकच्या एका तरुणाने पळून जाणाऱ्या चालकाचा पाठलाग करून पकडले व पोलिसांच्या हवाली केले.
राजू नत्थुजी मेहरकुळे (45, रा. दुधाळा) असे मुलाचे तर निलाबाई (60) असे मृत आईचे नाव आहे. राजू हा आईसह दुचाकीने निमखेडा येथे मामाच्या घरी जात होता. गावानजीच्या शनीमंदिराच्या थोडे अलीकडे नगरधनवरून रामटेककडे भरधाव येणाऱ्या पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात आई निलाबाई जागीच ठार झाल्या. तर रुग्णालयात घेउन जाताना राजूचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी वाहनचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी रामटेकच्या शनिवारी वार्डातील अमित बालाजी नागपुरे या तरुणाने दुचाकीने पाठलाग करीत वाहनाला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी वाहनचालकाने त्याच्यावर गाडी चढविण्याचा प्रयत्न केला. आरोपीने चिचाळा मार्गाकडे वाहन वळवताच रस्त्याच्या खाली वाहन उतरवून थांबला. येथून पळून जाण्याचा प्रयत्न करताना तरुणाने त्यास पकडून पोलिसांच्या हवाली केले. रामटेक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला असून आरोपी पिकअप वाहनचालक गोपाल महादेव चौधरी (रा. तारसा) यास अटक केली. त्याची रामटेक उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली. मृत राजू मेहरकुळे हा घरातील कमावता होता. त्याच्या पश्‍चात पत्नी, मुलगा व मुलगी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT