two men end man life in Amravati district
two men end man life in Amravati district  
विदर्भ

ही कुठली विकृती? धक्का लागल्यामुळे चाकूने कापला युवकाचा गळा; सावरखेडा थांब्यावरील थरार 

संतोष ताकपिरे

बेलोरा (जि. अमरावती) ः नशेत असलेल्या दोघांपैकी एक जण युवकाच्या अंगावर पडला. त्याला हटकले असता चिडलेल्या दोघांनी युवकाचा चाकूने गळा कापून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी (ता. चार) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.

नीलेश अवधूत वरघट (वय 25, रा. सावरखेडा), असे हल्ल्यातील गंभीर जखमीचे नाव आहे. असे शिरखेडचे पोलिस निरीक्षक केशव ठाकरे यांनी सांगितले. जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

दुपारच्या सुमारास नीलेश हा सावरखेडा येथील बसस्थांजवळ बसला होता. त्याचवेळी जवळून विशाल खंडारे व सागर मोहोड (दोघेही रा. घोडगव्हाण) हे नीलेशच्या जवळून जात होते. तोल गेल्यामुळे विशाल हा नीलेशच्या अंगावर जाऊन पडला. त्यामुळे नीलेशने त्याला हटकले. त्यावरून विशाल व सागर या दोघांनी नीलेशसोबत वाद घालून त्याला शिवीगाळ केली. 

त्यानंतर सागरने नीलेशला पकडून ठेवले तर विशालने जवळच्या चाकूने नीलेशच्या गळ्यावर गंभीर स्वरूपाचे वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला. ग्रामस्थांनी जखमी नीलेशला उपचारासाठी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. जखमीचे वडील अवधूत वरघट यांच्या तक्रारीवरून शिरखेड पोलिसांनी विशाल व सागर या दोघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT