two suspended in case of giving sanitizer instead of polio to children in yavatmal 
विदर्भ

बालकांना पोलिओऐवजी सॅनिटायझर पाजणारे दोघे बडतर्फ, वैद्यकीय अधिकाऱ्यासह दोघांना नोटीस

राजकुमार भितकर

यवतमाळ : जिल्ह्यात भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत कापसी येथे पोलिओ लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गावातील 12 मुलांना पोलिओच्या जागी सॅनिटायझर पाजण्यात आले. याप्रकरणी आरोग्य विभागातील समुदाय अधिकारी, आशा वर्कर यांना बडतर्फ केले आहे. याशिवाय  अंगणवाडी सेविका यांचा कारवाईचा प्रस्ताव 'आयसीडीएस'कडे पाठविण्यात आला आहे. याशिवाय प्रभारी वैद्यकीय अधिकारी महेश मनवर आणि भूषण मसराम यांना कारणे दाखवा नोटीस दिली गेली आहे. त्यांचा खुलासा आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेला रविवारी, ३१ जानेवारीपासून सुरुवात झाली. घाटंजी तालुक्यातील कापसी (कोपरी) येथे १२ बालकांना लस पाजण्याऐवजी चक्क सॅनिटायझर पाजल्याची घटना घडली आहे. ही सर्व मुले एक ते ५ या वयोगटातील आहेत. मुलांना उलटीचा त्रास झाल्याने पालकांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यामुळे रात्रीच १२ बालकांना रुग्णालयात भरती करण्यात आले. 

या घटनेची संपूर्ण चौकशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ अद्यापही करीत आहेत. मुलांना लस म्हणून सॅनिटायझर पाजण्यात आले हे केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी काही वेळाने त्या सर्वांना पोलिओ डोस दिला. घटना घडल्यानंतर उशिरापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली गेली नव्हती, असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले. 

या बालकांना पाजले होते सॅनिटायझर - 
कापसी हे गाव घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येते. गिरीश किसन गेडाम, योगीश्री किसन गेडाम, अंश पुरुषोत्तम मेश्राम, हर्ष पुरुषोत्तम मेश्राम, भावना बापूराव आरके, वेदांत नितेश मेश्राम, राधिका नितेश मेश्राम, प्राची सुधाकर मेश्राम, तनुज राम गेडाम, निशा प्रकाश मेश्राम व आस्था प्रकाश मेश्राम अशी सॅनिटायझर पाजण्यात आलेल्या बालकांची नावे आहेत. त्यांना यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले आहे. 

संपादन - भाग्यश्री राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena पक्ष अन् धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडे गेलं तर शिंदेंपुढे काय पर्याय? भाजपमध्ये विलीन होणार?

Chamoli Tunnel Accident: १९ कामगारांना रात्रीतून बाहेर काढले; चमोलीतील बोगदा दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांकडून मदतकार्याची पाहणी

Pimpalgaon Joge Dam: धरण ९६ टक्के भरताच मेमाणे वस्तीत पाणी शिरले! २० कुटुंबांसह १०० ते १२५ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Marathi News Live Updates : काल, आज आणि उद्याही शिवसेना ठाकरेंचीच असेल; काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे?

Skip the Elevator: रोज जिना चढल्याने Heart Attackचा धोका कमी! पाहा काय सांगतो नवीन संशोधन अहवाल...

SCROLL FOR NEXT