arrested 
विदर्भ

यवतमाळ - दोन टॉवर बॅटरी चोरांना अटक

अशोक काटकर

दारव्हा (यवतमाळ) : तालुक्यातील तरणोळी येथील मोबाइल टॉवरच्या बॅटर्‍या चोरणार्‍या दोघांना मंगळवारी (ता.5) सकाळी चिखली गावातून अटक केली. या कारवाईत दोन लाख 59 हजार 968 रुपयांच्या 48 बॅटर्‍या व आठ लाखांची तवेरा गाडी असा एकूण दहा लाख 59 हजार 968 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यातील दोन चोरटे फरार असून, दारव्हा पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिस सूत्रांनी सांगितल्यानुसार मंगळवारी पहाटे सव्वादोनला तरणोळी गावातील मोबाईल टॉवरचा अलार्म वाजला. याबाबतची माहिती सुरक्षा सुपरवायझर ओंकार जाधव (रा.यवतमाळ) यांनी देताच दारव्हा पोलिस लगेच घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहताच एम. एच. 26 एफ. 1000 या क्रमांकाच्या तवेरा वाहनातून चालक गाडी सोडून पळाला. सोबत गाडीमधील इतर तीन संशयितही पळून गेले. त्यानंतर पोलिस दारव्ह्याकडे परत येत असताना चिखली गावात तीन अनोळखी व्यक्ती दिसून आले. त्यांना विचारपूस केली असता, त्यांनी पळ काढला. त्यांचा पाठलाग करीत संशयित रजाकत इस्राईल खान (वय 40, रा. हिवरखेड ता. तेल्हारा जि. अकोला) व मोहम्मद शफीउल्ला खान (रा. अकोट. जि. अकोला) या दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले, तर संशयित इम्रान अली शहारत अली (वय 35, रा अकोट) व शेख वकील शेख रफिक (वय 20, रा. हिवरखेड ता. तेल्हारा) हे पळून जाण्यास यशस्वी झाले.

यावेळी चोरट्यांकडून एक लाख 29 हजार 984 रुपयांच्या 24 बॅटर्‍या व आठ लाखांची तवेरा गाडी पोलिसांनी जप्त केली. ठाणेदार रिता उईके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय शिंदे, व्यंकटेश मच्छेवार , निवृत्ती कुळशिंगे, विशाल गेडाम, इमाम चौधरी, गोपाल अकोटकर, गिरीश मडावी, अशोक चव्हाण, प्रवीण इंगोले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

चोरी करण्यापूर्वी अलार्म ब्लॉक
गेल्या गुुरुवारी (31 मे) तरणोळी गावातील टॉवरच्या 24 बॅटर्‍या चोरल्याची कबुली चोरट्यांनी पोलिसांनी केलेल्या चौकशीत दिली. विशेष म्हणजे चोरी करण्यापूर्वी अलार्म ब्लॉक करण्यात यश आलेले होते, त्यामुळे पहिल्या दिवशी अलार्म वाजला नसल्याचेही चोरट्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT