file photo
file photo 
विदर्भ

चिमुरात दोन वाहनांची धडक; चालक जखमी 

सकाळ वृत्तसेवा

चिमूर (जि. चंद्रपूर) ः उपजिल्हा रुग्णालयाकडून मुख्य मार्गाने येणाऱ्या टाटासुमोने ट्रकला धडक दिली. या अपघातात टाटासुमो चक्काचूर झाली असून चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी नागपूरला रेफर करण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी (ता. 10) सायंकाळी बालाजी मंदिरासमोर घडली. जखमी चालकाचे नाव राहुल राजू वाकडे आहे. 
एमएच 34 एए 0302 क्रमाकांची सुमो खडसंगी येथून चिमूरकडे येत होती. तिच्या समोरच मुख्य मार्गावरून कोळशाचा ट्रक चालत होता. त्याला ओव्हरटेक करण्याच्या नादात सुमोचालकाने वाहन भरधाव चालवून बालाजी मंदिराजवळ उभ्या ट्रकला धडक दिली. त्यानंतर एका बूटहाऊसमध्ये ती शिरली. घटनेची माहिती मिळताच चिमूर युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष विनोद शर्मा यांनी जखमी सुमोचालकाला वाहनातून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. प्राथमिक उपचारानंतर त्याला नागपूरला रेफर करण्यात आले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT