file photo
file photo 
विदर्भ

राष्ट्रसंतांच्या अध्यासनाला यूजीसीचे अनुदान!

सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाला विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता नसल्याने बऱ्याच वर्षांपासून अनुदान मिळत नाही. मात्र, त्यासाठी विद्यापीठाकडून अनुदान आयोगाला मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे अध्यासनाला आयोगाचे अनुदानही मिळणार आहे. याचा फायदा येथे पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळेल.
बऱ्याच वर्षांपूर्वी विद्यापीठात राष्ट्रसंतांच्या अध्यासनास सुरुवात करण्यात आली. यात राष्ट्रसंतांच्या एम. ए. पदवीचे शिक्षण दिले जाते. काही दिवसांपूर्वीच या अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्यात पाच हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय कुलगुरूंनी घेतला. मात्र, अध्यासनाला यूजीसीचे अनुदान नसल्याने पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांची बरीच अडचण होते. ही बाब अभ्यास मंडळाचे सदस्य ज्ञानेश्‍वर दुर्गादास रक्षक यांनी कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिली. त्यावरून कुलगुरूंनी दोन ते तीन महिन्यांत विद्यापीठस्तरावरील सोपस्कार पूर्ण करून अनुदान आयोगाकडून मान्यता प्राप्त करण्यात येईल, असे आश्‍वासन त्यांनी ज्ञानेश्‍वर रक्षक यांना दिले.
पुण्यस्मरणाचा कार्यक्रम दीक्षान्त सभागृहात
देशात 17 ऑक्‍टोबरला राष्ट्रसंतांचा पुण्यस्मरण दिवस मानवता दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र, हा कार्यक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाच्या सभागृहात घेण्यात येतो. ज्यांच्या नावावर विद्यापीठ आहे, त्यांचा पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमात विद्यापीठ आणि महाविद्यालयस्तरावरील लोकांना सहभागी होता यावे, यासाठी हा कार्यक्रम अध्यासनाच्या सभागृहाऐवजी दीक्षान्त सभागृहात घ्यावा, अशी मागणी ज्ञानेश्‍वर रक्षक यांनी केली. ही मागणी कुलगुरूंनी मान्य करीत, नेहमीसाठी हा कार्यक्रमात दीक्षान्त सभागृहात घेण्याची घोषणा केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

iPhone Alarm issue : जगभरातील लोकांना आज उठायला झाला उशीर.. आयफोनचे अलार्म वाजलेत नाहीत! काय आहे कारण?

Rinku Singh : संघ निवडीबाबत मोठा खुलासा! BCCI च्या 'या' नियमामुळे रिंकूचे वर्ल्ड कप खेळण्याचे मिळाले स्वप्न धुळीस?

Traffic Noise: गाड्यांच्या आवाजामुळे वाढू शकतो हृदयविकार, डायबेटिस आणि स्ट्रोकचा धोका; धक्कादायक संशोधन समोर

Latest Marathi News Live Update: विदर्भ राज्य पार्टीच्या वतीने आज महाराष्ट्र दिवस हा काळा दिवस म्हणून पाळला जात आहे

SCROLL FOR NEXT