विदर्भ

भयंकर! जागेच्या वादातून काकाने केला पुतण्याचा खून; सात आरोपींना अटक

सकाळ वृत्तसेवा

मोहाडी (जि. भंडारा) : एकाच कुटुंबातील शेतीच्या हिस्सेवाटणी वरून (land dispute) झालेल्या वादात काकाने पुतण्याचा खून (Uncle kills nephew) केल्याची घटना शुक्रवारी सकाळी तालुक्‍यातील रामपूर शिवारात घडली. यात पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. रवींद्र श्‍यामराव सव्वालाखे (वय ३८) असे मृताचे नाव आहे. (Uncle kills nephew over land dispute Bhandara district news)

मांडेसर येथील सव्वालाखे कुटुंबाच्या शेतीचे काही दिवसांपूर्वी पोट हिस्से करण्यात आले. परंतु, जागेच्या वाटणीवरून या कुटुंबातील काही सदस्य असमाधानी होते. त्यामुळे त्यांच्यात वाद होता. शुक्रवारी सकाळी रवींद्र शामराव सव्वालाखे हा रामपूर शिवारातील शेतात गेला. तेव्हा आरोपींसोबत त्याचा वाद झाला.

काका व चुलत भाऊ असलेल्या आरोपींनी त्याच्यावर हल्ला चढवला. रवींद्रच्या डोक्‍यावर काठीने जोरदार वार केल्याने तो जागेवरच मृत्यूमुखी पडला. भांडणाचा आवाज मृताचा लहान भाऊ देवेंद्र धावत आला. परंतु, आरोपी हातात लाठ्याकाठ्या व लहान तलवार घेऊन त्यालाही मारायला धावले. यात किरकोळ जखमी झाला पण तो आपला जीव वाचविण्यात यशस्वी झाला.

देवेंद्र शामराव सव्वालाखे याच्या तक्रारीवरून मोहाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी शोभेलाल उपासू सव्वालाखे (वय ५७), शिवा उपासू सव्वालाखे (वय ५५), बाबूलाल उपासू सव्वालाखे (वय ५३) गेंदालाल जलकन सव्वालाखे (वय ३८), दुर्गाप्रसाद शिवा सव्वालाखे (वय २३), बळीराम बाबूलाल सव्वालाखे (वय २१), विनोद जलकन सव्वालाखे (वय ३५) रा. रामपूर (मांडेसर) या सात आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार राहुल देशपांडे, एपीआय राजेंद्र गायकवाड, हवालदार सोमेश्वर सेलोकर, मिथुन चांदेवार, पवन राऊत, दुर्योधन भुरे, सागर भांडे हे करीत आहेत.

(Uncle kills nephew over land dispute Bhandara district news)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: चेन्नईला आव्हान देण्यासाठी पंजाब सज्ज; आत्तापर्यंत कोणाचं पारडं राहिलंय जड

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

PM Modi Exclusive: ठाकरे गटाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले, 'माझ्या कौटुंबिक स्थितीचीही थट्टा, पण..'

SCROLL FOR NEXT