अमरावती ः निदर्शने करताना विद्यापीठातील कर्मचारी.
अमरावती ः निदर्शने करताना विद्यापीठातील कर्मचारी. 
विदर्भ

सातव्या वेतन आयोगासाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा


अमरावती,  ः विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, या मागणीसाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कर्मचारी संघटनेतर्फे आज, गुरुवारी निदर्शने करण्यात आली.
यापूर्वी आंदोलनाचे दोन टप्पे यशस्वीरीत्या पार पडले. तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर व कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी भेट दिली. या वेळी कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख, महासचिव विलास सातपुते, ऑफिसर्स फोरमचे अध्यक्ष शशिकांत रोडे, उपाध्यक्ष प्रवीण राठोड, मागासवर्गीय कर्मचारी संघाचे अध्यक्ष डॉ. नितीन कोळी, उपाध्यक्ष मंगेश वरखेडे, उपाध्यक्ष संजय ढाकुलकर, नीलेश वंदे, सहसचिव विनोद लांजेवार, विठ्ठल मरापे, कोषाध्यक्ष सतीश मानकर, सदस्य प्रफुल्ल ठाकरे, मनीष शास्त्री, प्रेम मंडपे, सतीश लोखंडे, इंगोले, पुंडकर, देशमुख, मालधुरे आदी उपस्थित होते.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कर्मचारी संघटनेने आपल्या मागण्यांसाठी यापूर्वी 3 जून रोजी विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव व विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण यांना निवेदन दिले होते. परंतु अद्यापपर्यंत मागण्या मंजूर न झाल्याने 10 ते 12 जूनपर्यंत विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. 13 जूनला सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात कार्यरत असताना काळ्या फिती लावून विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर निदर्शने केलीत.
18 जूनला विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणे, 25 जून रोजी संचालक, उच्च शिक्षण, शिक्षण संचालनालय, पुणे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढणे, 29 जून रोजी एकदिवसीय लाक्षणिक संप आयोजित करणे व महासंघाच्या निर्देशानुसार जुलै महिन्यात कोणत्याही प्रसंगी बेमुदत संप पुकारणे, असे महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाने पुकारलेल्या आंदोलनाचे टप्पे आहेत. त्यानुसार आंदोलन विद्यापीठात करण्यात येत आहे. या आंदोलनात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कर्मचारी संघ, मागासवर्गीय कर्मचारी संघ व विद्यापीठ ऑफिसर्स फोरम सहभागी झाले आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT