गडचिराेली : चामोर्शी तालुक्यातील आष्टी-चामोर्शी मार्गावरील आष्टीपासून २ किलोमीटर असलेल्या अनखोडा नाल्याजवळील वळणावर क्रूजर वाहनाचा भीषण अपघातात २० जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (ता. २२) सकाळी ५.३० च्या सुमारास घडली.
गडचिरोलीवरून आष्टीकडे जाणाऱ्या गाडी क्र सीजी ०९ जेजे ४८०० ने अनखोडा जवळील वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन २०० मीटर दूर जाऊन खड्ड्यात उलटले. त्यामुळे वाहनात १७ मिरचीतोड़ मजूर तर चालक, क्लिनर व इतर एक असे २० जण होते. हे वाहन मध्य प्रदेशातून तेलंगणा राज्यात मिरचीतोड़ मजुरांना घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांना हा अपघात लक्षात आला. संतोष नागरगोजे व इतर नागरिकांनी जखमींना वाहनातून बाहेर काढले. तसेच आष्टी पोलिसांना सूचना देण्यात आली.
तत्काळ पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले, महिला पोलिस उपनिरीक्षक वैशाली कांबळे, राजू पंचफुलीवार,फुंडगिर आदी आष्टी पोलिस कर्मचारी घटनास्थळावर पोहचुन जखमींना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराठी दाखल करण्यात आले तर सामाजिक कार्यकर्ता संजय पंदीलवार यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपुस करून गंभीर जखमी असलेल्यांना रेफर करण्यासाठी दोन १०८ रुग्नवाहिकांची व्यवस्था करून दिली. या अपघातात चालक दिनेशकुमार परते (वय २३)3 रा. उमरिया जिल्हा मंडला, आशा इन्द्रेश कोडापे (वय२९)रा. पातादेई जिल्हा मंडला, ढगेरू बत्तु हरीसिंग यादव (वय १८)रा बनियातारा जिल्हा मंडला, जानकी शिवप्रसाद मारकु (वय २९) रा सहेपरा जिल्हा डिंडोरी, मीनाबाई प्रितमदास बगेल (वय ३४) रा. बनियातारा जिल्हा मंडला, गणपतियाबाई सीताराम सङको (वय ४५) रा. बनियातारा जिल्हा मंडला, अर्चना गंगाराम पंदराम (वय २६) रा. बनियातारा जिल्हा मंडला, चेतराम भड्डूसिंग मसराम (वय ५३) रा. उमरिया जिल्हा मंडला,सांबती मौली मात्रामा (वय ३४) रा. उमरिया जिल्हा मंडला, रामसिंग झमलूसिंग धुर्वे (वय ३५) रा. पढाधार जिल्हा मंडला, रामचरण काशीराम नरते (वय ४५)रा. उमरिया जिल्हा मंडला, रामबत्ती रामप्यारे धुर्वे (वय ३०) रा. पढाधर जिल्हा मंडला, शिवचरण काशीराम नरते (वय ३०) रा. उमरिया जिल्हा मंडला, सीताराम भैयालाल सोनवणे (वय ५०) रा. बनियातारा जिल्हा मंडला, संतोषी बुधुलाल यादव (वय १८) रा. बनियातारा जिल्हा मंडला, वसंत हरिलाल वयाम (वय २६) रा. मंगवानी जिल्हा मंडला, निरंता रामचरण नरते (वय १७) रा. उमरिया जिल्हा मंडला, रौशनी मौली वयाम (वय १४) रा. अवराली जिल्हा मंडला, इन्द्रेश कमलसिंग कोडापे (वय २१) रा. उमरिया जिल्हा मंडला,) इन्द्रेशकुमार पंखुसिंग कोडापे (वय २२) रा. मोहगाव जिल्हा मंडला हे सर्व मध्य प्रदेश राज्यातील मजूर जखमी झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.