very low responce recored to st 
विदर्भ

एसटीला मिळाले बोटांवर मोजण्याइतकेच प्रवाशी, उत्पन्न 99 टक्‍क्‍यांनी घटले

भूषण काळे

अमरावती : कोरोनामुळे लॉकडाउनचा जबरदस्त फटका राज्य मार्ग एसटी महामंडळाला बसला असून मागील आठ दिवसांत एसटीचे उत्पन्न जवळपास 99 टक्‍क्‍यांनी घटले आहे. 22 मे पासून जिल्ह्यातील चांदूरबाजार, परतवाडा, दर्यापूर, अंजनगाव, चांदूररेल्वे आदी मोजकेच बसस्थानक सुरू झालेत. आठ दिवसांत महामंडळाला केवळ 2 लाख 48 हजार 126 रुपयांचे उत्पन्न झाले. 22 ते 28 मे या कालावधीत एसटीने 27 हजार 364 किलोमीटरचे अंतर पूर्ण करत अडीच लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले.

बडनेरा आणि अमरावती बसस्थानक अजूनही सुरू झाले नाही. एसटीचा सध्या जिल्ह्यातूनच प्रवास सुरू आहे. श्रमिक कामगार तथा अडकलेले नागरिक वगळता एसटीची चाके जिल्ह्याबाहेर गेलेली नाहीत. जादा गर्दीच्या हंगामातच महामंडळावर ही वेळ आल्याने महामंडळाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातच अमरावती आगार हे जादा उत्पन्न देणारा डेपो आहे. मात्र रेड झोनमुळे हे स्थानकच बंद असल्याने महामंडळाच्या उत्पन्नावर गडद सावट आले आहे.

कुठे 40 लाख अन्‌ कुठे 40 हजार

लॉकडाउनपूर्वी महामंडळाला दरदिवशी 40 ते 45 लाख रुपयांचे उत्पन्न व्हायचे. लॉकडाउनमध्ये एसटीची चाके जागच्या जागीच थांबून असल्याने महामंडळाला दोन महिन्यांत तब्बल 25 कोटी रुपयांचा फटका एकट्या अमरावती जिल्ह्यातून बसला आहे. पूर्वी एका दिवशी 40 लाख रुपयांचे उत्पन्न सध्या 40 हजारांवर आले आहे. यावरून महामंडळाचे उत्पन्न तब्बल 99 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे.

मालवाहतुकीचा उतारा

प्रवाशी तुट भरून काढण्यासाठी महामंडळाने मालवाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे एसटीला आधीचे दिवस कधी प्राप्त होईल, हे अनिश्‍चित आहे. त्यामुळेच महामंडळाने मालवाहतूक चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक स्थानकावरून ही मालवाहतूक केली जाईल, असे एसटी सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay Of Bengal Low Presssure : हंगामी कमी दाबाचा पट्टा सक्रिय; पाऊस पुन्हा जोर धरणार, महाराष्ट्रात २२ जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज

Sindhudurg Crime: सावंतवाडीतील बाप-लेकाचा म्हापसा येथे गूढ मृत्यू; पत्नी अत्यवस्थ; कारण अस्पष्ट, घातपाताची शंका, रात्री काय घडलं..

Ketan Agarwal Murder : ११.५ तासांच्या चौकशीत सियाच्या आई-वडिलांनी काय सांगितलं? एकाच खुलाशाने हत्या प्रकरणाला नवं वळण, सियाला तोंडघशी पाडले

Women's T20 World Cup: भारत-ऑस्ट्रेलिया आज आमनेसामने; पराभवानंतरही टीम इंडिया सेमीफायनल गाठू शकते? समजून घ्या संपूर्ण गणित!

Satara Crime: मायणीत १७ लाखांच्या बेकायदेशीर जिलेटिन साठ्यावर पोलिसांचा छापा; दोघा भावांना अटक, सातारा जिल्ह्यात खळबळ!

SCROLL FOR NEXT