arrest
arrest 
विदर्भ

एटापल्लीत विदेशी दारू साठा जप्त

सकाळवृत्तसेवा

एटापल्ली -  जिवनगट्टा गावातील पोचू पांडु नरोटे वय 50 वर्ष यांचे घरी स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीच्या पथकाने टाकलेल्या धाडीत तिन लाख 27 हजार रुपये किंमतीचा अवैध दारू साठा जप्त करण्यात आला असुन चार आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुख्य आरोपी पोचू नरोटी याला अटक करण्यात आली असुन इतर तिघे फरार झाले आहेत. पोचू नरोटे याचे सांगण्यावरुन त्याचा मुलगा सुनिल पोचू नरोटे, पुतण्या राजू नरोटे (सर्व राहणार जिवनगट्टा) व ठोक अवैध दारु पुरवठादार सुजल मंडल (चामोर्शी) यांचेवर एटापल्ली पोलिसात गुन्हे दाखल करुन शोध घेतला जात आहे  

तालुक्यात अवैध दारू, सुगंधित तंबाखू, गांजा व जुगार अड्डे व्यवसायांना उधाण आल्याची ओरड नागरिकांकडून होत असतांनाच वरिष्ठ पोलीस प्रशासनाने दखल घेवून केलेल्या कार्यवाहीने अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे. अशा अवैध व्यवसायात राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसेच पोलिस कर्मचा-यांचे नातेवाईक गुंतले असल्याने नागरिक तक्रार करण्यास घाबरतात. मात्र या कारवाईतून पोलिस प्रशासनाने नागरिकांमधली भिती दूर केली असल्याचे दिसून येते

सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक युवराज घोडके, प्रदीप चवरे, अंकुश धांडे व इतर कर्मचा-यांनी केली आहे पुढिल तपास एटापल्ली पोलीस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', थालावर भडकला चेन्नईचा माजी स्टार खेळाडू

Latest Marathi News Update : गाझियाबादमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी हजर

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT