Vidarbha Rain Update 
विदर्भ

Vidarbha Rain Update: पावसाचा हाहाकार! २८० जणांचे स्थलांतर, अनेकांचे संसार उघड्यावर... बळीराजा संकटात

Sandip Kapde

Vidarbha Rain Update: विदर्भात पावसाने हाहाकार माजवला आहे. यवतमाळ, वाशिम, बुलढाण्यामध्ये पावसाने कहर केला.  यवतमाळमधील अनेक तालुक्यात जोरदार पाऊस बरसला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील २८० जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील ४० हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली खरडून गेले आहेत. पैनगंगा,वर्धा, वाघाडी या नदीकाठच्या गावांना पुराचा मोठा वेढा बसला आहे. दुर्भा, दिग्रस, धानोरा या गावांचा पुरामुळे संपर्क तुटला आहे. तुफान पावसाचा तडाखा यवतमाळला बसला आहे. Vidarbha Rain Update

महागाव तालुक्यात असलेल्या अनंतवाडी/आनंदनगर तांडा येथे पुरामुळे नागरिक अडकले होते. येथील ६० घरांना पाण्याने वेढले होते. शनिवारी सायंकाळच्या सुमारास बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न करून २८० जणांना बोटीच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी हवाई दलाचे हेलिकॉप्टर नागपूरवरून आले होते.

बुलढाण्यात जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस-

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर आणि शेगाव तालुक्यात मोठा पाऊस झाला. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. ४० ते ४५ गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे अनेकांची घरे उद्धवस्त झाले आहेत.

कालच्या पावसाने शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. संततधार पावसाने गडचिरोलीत जिल्ह्यातील १३ प्रमुख मार्ग बंद झाले आहेत. अकोला जिल्ह्यात अनेक पुलांवरून पाणी वाहत असल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. बुलडाणा आणि अमरावतीत दोन जण वाहून गेले आहेत.

अमरावती जिल्ह्यात तीन जण वाहून गेले

धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळका पटाचे येथील शेतकरी उमेश मारोती मोडक (वय ३४) शेतातून घरी परत येत असताना गावाजवळील नाल्यात पाण्याच्या लोंढ्यामुळे वाहून गेले. चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगावबंड जमापूर येथील पूर्वेश नामदेव पारिसे (वय २०) हा युवक नाला ओलांडत असताना पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्याचा शोध सुरु आहे. तिसरी घटना मोर्शी तालुक्यात घडली. माळू नदीत शनिवारी लक्ष्मी अजय उबनारे (वय ३७, रा. सालबर्डी, ता. मुलताई) या महिलेचा मृतदेह आढळून आला.

काथरगावात १२० जणांना वाचवले

बुलडाणा जिल्ह्यात काथरगाव पिंप्री येथे १२० नागरिक पाण्यात अडकले होते. पांडव व लेंडी नदीमुळे या गावाला पुराने वेढले आहे.  या नागरिकांना एनडीआरफच्‍या चमूने सुखरूप बाहेर काढले. येथील परिस्‍थितीवर आमदार डॉ. संजय कुटे, एसडीओ शैलेश काळे, तहसीलदार योगेश टोन्पे लक्ष ठेवून आहेत.
  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: शेतात विजेच्या धक्क्यामुळे एकाच कुटूंबातील पाचजण ठार

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT