file photo
file photo 
विदर्भ

अपहरण करून कुख्यात विजय मोहोडचा खून

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : क्रिकेट बुकीला केलेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी सेटलमेंट करण्याच्या बहाण्याने बोलावून कुख्यात गुंड विजय नारायण मोहोड (वय 27, नरसाळा, हुडकेश्‍वर) याचा खून करण्यात आला. बिट गॅंगने त्याचा खून केल्याचे उघडकीस आले असून, हुडकेश्‍वर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. सोमवारी हत्याकांड उघडकीस आले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुने वैमनस्य तसेच नवीन जुगार अड्‌डा उघडल्याने विजय मोहोड आणि बिट गॅंगमध्ये अनेक दिवसांपासून शीतयुद्ध सुरू होते. बिट गॅंगमधील अभय राऊत, बॉबी धोटे, निखिल तिडके, लल्ला मिश्रा, काल्या शाहू, दिलीप ठवकर, सूरज कार्लेवार यांच्यासह 10 ते 15 आरोपींनी विजू मोहोडचा "गेम' करण्यासाठी कट रचला. मोहोड हा रविवारी रात्री आउटर रिंग रोडवरील अमित सावजी भोजनालयात मित्र रूपेश बोंडे आणि चंद्रशेखर वैद्य यांच्यासोबत जेवण करीत होता. निखिल तिडके याने विजूला जमीन दाखविण्याच्या बहाण्याने एका ठिकाणी बोलावले. तेथे आधीच पाच ते सहा कारसह सुमारे 25 आरोपी उभे होते. त्यांनी मोहोडला कारमध्ये कोंबले. वेळा हरिश्‍चंद्र गावाजवळील जंगलात नेले. तिथे चाकू, तलवारी, गुप्तींनी भोसकून मोहोडचा मोठ्या निर्घृणपणे खून केला. मृतदेह वेळा हरिश्‍चंद्र गावाजवळ रस्त्यावर फेकून दिला. आज सोमवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांना विजूचा मृतदेह आढळला. हुडकेश्‍वर पोलिसांनी बिट गॅंगमधील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हेगारी जगतात विजय मोहोडचे "टॉप फाइव्ह'मध्ये नाव घेतले जाते. त्याचा रविवारी खून झाल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे शहर आणि ग्रामीण पोलिस सतर्क झाले होते. रविवारी रात्रीच शेकडो किलोमीटरचा परिसर पोलिसांनी पालथा घातला होता. भरदिवसा खून करणे, चाकूच्या धाकावर लूटमार करणे, खंडणी वसुली आणि क्रिकेट सट्‌टेबाजी आणि जुगार अड्‌डा चालविण्यासाठी मोहोड ओळखला जात होता. त्याच्याविरुद्ध कुही, कन्हान, हुडकेश्‍वर आणि अन्य ठाण्यांत खुनाचे गुन्हे दाखल आहेत. 10 दिवसांपूर्वी बुटीबोरीच्या डान्सबारमध्ये विजय मोहोडसह अर्जुन रेड्‌डी, अभय, दिलीप, उल्ला, गोलू गोंडे उपस्थित होते. येथे अभय आणि विजयमध्ये तु-तु-मैं-मैं झाली होती.
बिट गॅंगचा म्होरक्‍या शरण
बिट गॅंगचा म्होरक्‍या स्वप्निल साळुंखे याच्यावर 2017 मध्ये ईप्पा गॅंगच्या मदतीने पोलिसांवर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणात दोन दिवसांपूर्वी स्वप्निल पोलिसांना शरण आला. विजय मोहोडच्या हत्याकांडात आपले नाव येऊ नये याकरिता त्याने आधीच शरणागती पत्करल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT