file photo
file photo 
विदर्भ

20 हजारांची लाच घेताना ग्रामसेवकाला अटक

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : रस्ता कामाचे प्रमाणपत्र देण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून ग्रामसेवकाला रंगेहाथ पकडले. नागसू जित्रू नरोटे, असे अटक केलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे.
ते सिरोंचा तालुक्‍यातील कोपेला ग्रामपंचायतीत कार्यरत आहेत. या ग्रामपंचायतीअंतर्गत गावालगत दहन व दफनभूमीकडे जाण्यासाठी सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने ग्रामसेवकाकडे काम पूर्ण झाल्याच्या प्रमाणपत्राची मागणी केली. मात्र, या कामासाठी ग्रामसेवकाने 20 हजार रुपयांची मागणी केली. कंत्राटदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. गुरुवारी (ता. 10) लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून ग्रामसेवक नागसू नरोटे यांना रंगेहाथ पकडले. त्याच्या विरोधात सिरोंचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT