File photo
File photo 
विदर्भ

नागरिकांनी केली नक्षल बॅनरची होळी

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या विलय सप्ताहाला नागरिकांनी विरोध करीत रविवारी (ता.22) बॅनर जाळून घोषणाबाजी केली.
एटापल्ली तालुक्‍यातील पेंढरी ते ढोरगट्टाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत नक्षलवाद्यांनी लोकांच्या मनात दहशत, वाहतुकीस अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशाने लाल कापडी बॅनर लावले होते. पेंढरी हद्दीतील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे एकत्र येऊन ते बॅनर काढून त्याची होळी केली. यावेळी नागरिकांनी नक्षलवाद मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.
नक्षलवादी निष्पाप आदिवासी नागरिकांचा निर्घृण खून करतात तसेच बॅनरबाजी करून सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, जनतेने नक्षलवाद्यांना चांगल्या प्रकारे ओळखले असून यामुळेच आम्ही नक्षलवाद्यांचा विरोध करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT