Vinod Wagh sakal
विदर्भ

Vinod Wagh : दोन मुलांना विनोद वाघ यांनी शिक्षणासाठी घेतले दत्तक !

आत्महत्याग्रस्त कुटंुबाला २१ हजारांची आर्थिक मदत

सकाळ वृत्तसेवा

सिंदखेडराजा : ऊसतोड कामगार आत्महत्याग्रस्त कुटुंबातील दोन मुलांना भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. आपला गड, आपली परंपरा, आपला दसराच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील भगवान गडावर भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ व बाळासाहेब सानप यांनी २१ हजार रुपये ऊसतोड कामगार आत्महत्याग्रस्त कुटुंबातील दोन मुलांना दिली. भगवानगड कृती समितीकडून यावर्षीपासून आपला गड, आपली परंपरा, आपला दसराला सुरुवात करण्यात आली आहे.

या वर्षीपासून भाजपाचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मातृतीर्थ ते भगवानगड शेकडो वाहनाची रॅली काढण्यात आली होती. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचे दर्शन घेऊन सकाळी ७ वाजता रॅलीला सुरुवात झाली. ठिकठिकाणी रॅलीचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. भगवान गडांच्या पायथ्यापासुन ते गडापर्यंत हजारो भक्तांची रॅली पाहायला मिळाली होती, यामध्ये युवकांपासून ते वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये लहान बालकांनी टाळ मृदुंगाचा गजर लक्षणीय होता.

बीड जिल्ह्यातील भारजवाडी येथील ऊस तोड कामगार वसंतराव कराड यांनी ६ लाख रुपये कर्ज असल्यामुळे कर्जाला कंटाळून काही दिवसापूर्वी आत्महत्या केली होती. त्यामुळे कुटुंबातील सदस्य तणावाखाली पाहायला मिळत होते. कुटुंबामध्ये पत्नी व लहान दोन मुले असल्याची माहिती भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ व त्यांच्या सहकार्‍यांना मिळताच सदर कुटुंबाशी संपर्क करून मदत करण्याचे आश्वासन कुटुंबाला दिले. ऊसतोड कामगारांची मुले असल्यामुळे त्यांच्यावर ऊस तोडण्याची वेळ येऊ नये, यासाठी दसर्‍याच्या मुहूर्तावर भगवानगडावर सीमो उल्लंघन केल्यानंतर तात्काळ त्याच ठिकाणी मुलांना २१ हजाराची मदत यावेळी त्यांनी केली. त्यांच्या पुढील शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली आहे.

यावेळी भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, दादासाहेब मुंढे, गणेश सानप, प्रसाद कुलकर्णी, शिवानंद आघाव, यांच्यासह भाविक भक्त उपस्थित होते.

श्री संत भगवान बाबा यांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा प्रमाणिक प्रयत्न करत आहे.ऊस तोड कामगारांने कर्जामुळे आत्महत्या केली त्यांच्या कुटूंबामध्ये पत्नी व दोन मुले आहे. कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे मुलांवर ऊस तोडनीची वेळ येवु नये, यासाठी दोन्ही मुलांना पुढील शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. तसेच २१ हजार रुपये नगदी स्वरूपात कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात आली.

-विनोद वाघप्रदेश प्रवक्ता भाजपा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT