Party.jpg
Party.jpg 
विदर्भ

मतदारांनी ‘पार्सल’ नाकारले!

सुगत खाडे

अकोला : जिल्हा परिषद-पंचायत समितींच्या निवडणुकीत ‘पार्सल’ (मतदार संघाबाहेरील) उमेदवारीच्या मुद्यावरून वंचित बहुजन आघाडी (अर्थात भारिप-बमसं) मधील असंतोष समोर आला होता. निवडणुकीच्या रिंगणातील या ‘पार्लस’ उमेदवारांपैकी सहा ‘पार्सल’ उमेदवार मतदारराजाने नाकारले आहेत; तर ‘सात’ पार्सल उमेदवारांना मतदारांनी कौल दिला आहे. मतदारांनी नाकालेल्या पार्सल उमेदवारांचे पक्षाअंतर्गत बंडखोरांनीच काम दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

जिल्हा परिषदेसह त्याअंतर्गत येणाऱ्या सात पंचायत समितींच्या निवडणुकीत उमेदवारी देतांना वंचितच्या (भारिप) निष्ठावंतांना डावलण्यात आले होते. त्यामुळे उमेदवारीच्या मुद्यावरून भारिप-बमसंमध्ये प्रचंड असंतोष असल्याची चर्चा निवडणुकीदरम्यान राजकीय वर्तुळात रंगली होती. पक्षाने तब्बल १५ पेक्षा अधिक उमेदवार ‘पार्सल’ दिले होते. याव्यतिरीक्त महानगरात कार्यरत असलेल्या तिघांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले होते.

अनेक दिग्गज व निष्ठावान कार्यकर्त्यांना नारळ दिल्यामुळे भारिपमध्ये सर्वात जास्त प्रमाणात असंतोष पाहायला मिळाला होता. निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आल्यामुळे पक्षवाढीसाठी काम करणाऱ्या निष्ठावंतांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत होता. परिणामी बंडखोरी करून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले बंडोबा शांत करण्यासाठी भारिपने तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती. सदर समितीने बंडखोरांची मनधरणी केल्यामुळे निवडणुकीतून बंडखोरांनी माघार घेतली होती.

आता निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर भारिपच्या पार्सल उमेदवारांपैकी सात ‘पार्सल’ उमेदवार विजयी झाले आहेत, तर सहांना पराभवाचा सामना करावा लागला. पक्षाअंतर्गत बंडोबांनीच भारिपच्या उमेदवारांना पराभूत करत मतांचे विभाजन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पराभूत ‘पार्सल’ उमेदवार (जिल्हा परिषद गट)
अशोक सिरसाट (राजंदा), राजेंद्र पातोडे (कान्हेरी सरप), मुक्ता सतीश बाबर (दगडपारवा), प्रतीभा अवचार (हातगाव), शोभा शेळके (कुटासा), सम्राट तायडे (पंचायत समिती सस्ती)

विजयी ‘पार्सल’ उमेदवार (जिल्हा परिषद गट)
ज्ञानेश्वर सुलताने (बाभुळगाव), आकाश शिरसाट (उगवा), चंद्रशेखर पांडे गुरुजी (कानशिवणी), पुष्पाताई इंगळे (चांदुर), मिनाक्षी उन्हाळे (चिखलगाव), राम गव्हाणकर (देगाव), प्रगती गजानन दांदळे (निमकर्दा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT