file photo
file photo 
विदर्भ

Vidhan Sabha 2019 : प्रत्येक ईव्हीएमला व्हीव्हीपॅट

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही सर्वच मतदान केंद्रावरील ईव्हीएमला व्हीव्हीपॅट मशीन राहणार आहे. मतमोजणीच्या वेळी व्हीव्हीपॅटची मोजणीसुद्धा केली जाणार आहे. 
ईव्हीएम हॅक होऊ शकते, असा आरोप करीत अनेक राजकीय पक्षांनी याद्वारे मतदान घेण्यास विरोध दर्शविला होता. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने यात आणखी पारदर्शिता आणण्यासाठी आणि मतदाराला मताची माहिती होण्यासाठी व्हीव्हीपॅट मशीन लावण्याचे आदेश दिले होते. देशपातळीवर लोकसभेत प्रथमच याचा उपयोग करण्यात आला. लोकसभेत संपूर्ण मतदार संघात याचा उपयोग झाला नसल्याची माहिती आहे. राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीतही व्हीव्हीपॅटचा उपयोग करण्यात येणार आहे. नागपुरातील बाराही मतदारसंघांतील सर्व ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट मशीन जोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. 
नागपूर जिल्ह्यातील 12 ही मतदारसंघात 4,412 मतदान केंद्र निश्‍चित केले आहेत. यासाठी 8,180 बॅलेट युनिट, 5,515 कंट्रोल युनिट तर 8,883 व्हीव्हीपॅट मशीन आहेत. दोन मतदार संघात 15 पेक्षा जास्त उमेदवार असल्याने दोन बॅलेट युनिट राहाणार असून, उर्वरित 10 मतदार संघात एकच बॅलेट युनिट राहणार आहे. सर्व ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन राहणार आहे. व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून मत कुणाला दिले हे मतदारास पाहता येईल. व्हीव्हीपॅट मशीनमधील स्लिप सात सेकंदापर्यंत पाहता येईल. यातील काही व्हीव्हीपॅट मशीनमधील स्लिपची मोजणी होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Bidkin Crime News : धक्कादायक! भीशीचे व व्याजाचे पैसे न दिल्याने महिलेसह पाच मुलांचे अपहरण

Yuzvendra Chahal: ऋषभ पंतची विकेट चहलसाठी ठरली ऐतिहासिक! T20 मध्ये कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दुसऱ्याच चेंडूवर राजस्थानला मोठा धक्का! जैस्वालला ४ धावांवरच झाला आऊट

SCROLL FOR NEXT