Court Sakal
विदर्भ

Wardha Crime News : विनयभंग करणाऱ्यास तीन वर्षांचा सश्रम कारावास; जिल्हा न्यायालयाचा निवाडा

सकाळ डिजिटल टीम

वर्धा : अल्पवयीन मुलीचा विनयंभग केल्या प्रकरणी आरोपी अमर चंद्रसुर वाघमारे (वय ३२) रा. महाकाळ, याला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदानुसार तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व तीन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. हा निवाडा येथील अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश १, व्हि. टि. सुर्यवंशी यांनी दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, यातील पीडिता ही इयत्ता १० वीचे शिक्षण घेत होती. आरोपी हा पिडीतेच्या घरा शेजारी राहत असल्याने पिडीता त्याला मामा म्हणत होती. घटनेच्या दोन वर्षापूर्वी आरोपी हा पीडीतेकडे डोळयाने ईशारे करत होता ही गोष्ट पिडीताने तिच्या आईला सांगितल्याने त्याची समजूत घातली होती. याच कारणातू वाद झाला होता.

पीडितेचे आई-वडील मजुरीच्या कामावर गेल्याची संधी साधत बरेचदा पीडिच्या घरात शिरून ओढतान केली मात्र बदनामीच्या धाकाने तक्रार केली नाही. आरोपी अमरची हिम्मत वाढल्याने त्याने पुन्हा पीडितेच्या घरात शिरून मुलीशी अश्लिल चाळे केले. दरम्यान घटना पिडीतेच्या बहिने पाहिल्याने तिला अश्लिल शिवीगाळ करण्यात आली.

घडलेला घटनाक्रम मुलीने आईवडीलांना सांगितला. या प्रकरणी सावंगी पोलिसात तक्रार केली. प्रकरणाचा तपास महिला पोलिस उप-निरीक्षक, प्रिती किसन आडे, यांनी केला. तपासा दरम्यान आरोपीने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकार तर्फे विशेष सरकारी अभियोक्ता विनय आर. घुडे यांनी

कामकाज पाहीले व यशस्वी युक्तीवाद केला.पिडीता, प्रत्यक्षदर्शी साक्षदार पिडीताची लहान बहिण, पिडीताची आई, व इतर साक्षदार यांची साक्ष ग्राह्य धरून धरून न्यायाधीश - १, व्हि. टि. सुर्यवंशी यांनी तीन वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: बनावट विमा आणि एनपीएस विकणे महागात पडणार! रिझर्व्ह बँकेकडून कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी; कारवाई काय होणार?

Tukaram Mundhe: बोगस दिव्यांगांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये; कारवाई होणार?

World Record : भारताने मोडला रिकी पाँटिंगच्या ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड रेकॉर्ड! जगात अशी अविश्वसनीय कामगिरी करणारी पहिली टीम

Viral Video: धावत्या ट्रेनमधील स्टंटवर नेटकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले धाडस की..! पाहा व्हायरल व्हिडिओ

IND vs PAK: भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या विजयाचं 'धुरंधर' स्टाईल सेलिब्रेशन अफगाणिस्तान अन् बलुचिस्तानमध्ये? Video होतायेत Viral

SCROLL FOR NEXT