file photo
file photo 
विदर्भ

वर्धा : अन्‌ बंदुकीतून सुटली गोळी...वाचा

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : बंदुकीला खेळणं समजून त्यात गोळी कशी भरतात, याचे प्रात्यक्षिक स्वरूपात माहिती देताना अचानक बंदुकीतून गोळी सुटून महिलेच्या पोटात गेल्याने ती जखमी झाली. स्थानिक गिट्टीफैल परिसरात रविवारी (ता. 17) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

विनापरवाना बंदूक बाळगणारा जि. प. सदस्य उमेश जिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीची बंदूक जप्त केली. निकिता साई डोईफोडे (रा. जिंतूर जि. परभणी), असे जखमी महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे, जखमी महिला ही आरोपीची साळी आहे.

जि. प. सदस्य उमेश जिंदे, त्यांची पत्नी रितू जिंदे व उमेशची साळी निकिता डोईफोडे हे जेवण आटोपल्यानंतर घरासमोर उभे होते. त्यावेळी निकिता हिने तुम्ही नेहमीच रात्री उशिरापर्यंत बाहेर राहता. स्वत:ची काळजी घेत जा, असा भावनिक सल्ला दिला.

मी  बंदूक बाळगतो
त्यावर उमेशने घाबरू नका मी स्वत:च्या रक्षणासाठी बंदूक बाळगतो, असे म्हणत जवळ असलेली बंदूक निकिताला दाखविली. त्यानंतर निकितानेही उत्सुकतेपोटी बंदुकीत गोळी कशी भरली जाते, अशी विचारणा केली.

जखमी महिला रुग्णालयात दाखल
जि. प. सदस्य उमेशने बंदुकीत गोळी कशी भरली जाते याचे प्रात्यक्षिक दाखवीत असताना अचानक बंदुकीतून गोळी सुटली. बंदुकीतील गोळी निकिताच्या हाताला स्पर्श करून तिच्या पोटात शिरली. रक्तस्राव होत असल्याने सर्वांची तारांबळ उडाली. त्यानंतर जखमी निकिताला तत्काळ सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.

गावठी बनावटीची बंदूक जप्त
माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे तसेच रामनगर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या चमूने घटनास्थळ गाठून परिसराची पाहणी केली. या प्रकरणी रितू जिंदे यांच्या तक्रारीवरून आरोपी जि. प. सदस्य उमेश जिंदे याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून एक गावठी बनावटीची बंदूक जप्त केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश इटकर करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT