washim seems suspicious to come to the village from Mumbai, Pune city, the way of looking at those coming from the metropolis in rural areas has changed
washim seems suspicious to come to the village from Mumbai, Pune city, the way of looking at those coming from the metropolis in rural areas has changed 
विदर्भ

मुंबई, पुणे शहरातून गावाकडे येणारा संशयितच वाटतो, ग्रामीण भागात महानगरांतून  येणाऱ्याकडे बघण्याची दृष्टीच बदलली

सकाळ वृत्तसेवा

वाशीम ः सध्या संपूर्ण राज्य कोरोनाशी मुकाबला करीत आहे. दरम्यान या काळात दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे रितसर परवानगी घेऊन महानगरांतून नागरिक गावाकडे परत येत आहेत. मात्र, महानगरातून आलेला प्रत्येकच व्यक्ती कोरोना बाधितच असल्यागत त्यांच्याकडे पाहिल्या जात आहे. मात्र, ते सुद्धा आपल्याच गावचे नागरिक आहेत. ही बाब विसरल्यागतच वाटत आहे.


कोरोना या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी गर्दी टाळणे खूप गरजेचे आहे. मात्र, दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यातच मुंबई, पुणे, औरंगाबाद किंवा नागपूर सारख्या महानगरांत कामानिमित्त गेलेल्या नागरिकांच्या हातचा रोजगारही हिरावला गेला आहे. त्यामुळे हाताला काम नसतानाही घरभाडे खिशातून देण्याची वेळ येत आहे. ही बाब पाहता अनेकजण गावाकडे परत येत आहेत. या नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना 14 दिवस वेगळे ठेवले जात आहे.

 गावातील जिल्हा परिषद, महाविद्यालयांमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. तर काही गावांमध्ये जागा नसेल तर, शेतामध्ये झाडाखाली राहण्याची व्यवस्था ग्राम समितीकडून केली जात आहे. मात्र, महानगरांतून येणाऱ्या नागरिकांकडे वेगळ्याच तिरस्काराच्या नजरेने पाहिल्या जात आहे. यामध्ये सुज्ञ नागरिकांचा देखील सहभाग असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महानगरातून आलेला प्रत्येकच व्यक्ती कोरोना बाधित नाही. ही बाब पाहता चांगली वागणूक देण्याची मागणी केली जात आहे.

सहकार्य करूनही तिरस्कार कशासाठी?
महानगरातून आलेले नागरिक प्रथमतः आपली आरोग्य तपासणी करून घेतात, 14 दिवस वेगळे राहण्याची जेथे व्यवस्था असेल तेथे राहतात. कुणालाही काही त्रास असेल तर ग्राम समितीला कळविल्या जाते. मग, तिरस्कार कशासाठी? असा प्रश्‍न महानगरांतून परतलेल्यांमधून उपस्थित केला जात आहे.

स्थानिकांना संसर्गाची भीती
महानगरांतून येणाऱ्या प्रत्येकच नागरिकाला कोरोनाचा संसर्ग आहे. अशी शंका सध्या ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आहे. मोठ्या महानगरांतून आलेल्यांमुळे आपल्याला सुद्धा कोरोना होईल अशी भीती त्यांना वाटत आहे. मात्र, आरोग्य तपासणी, तोंडाला मास्क, शारीरिक दुरावा, 14 दिवस विलगीकरण आदी बाबींचे पालन केल्यास संसर्ग होऊ शकत नाही. त्यामुळे तहसील स्तरावरून देखील मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.

अशी आहे आजची स्थिती
गृह विलगीकरण .........41
संस्थात्मक विलगीकरण..17
अलगीकरण कक्ष ........11
तपासलेले एकूण स्त्राव..112
पॉझिटिव्ह अहवाल .....03
निगेटिव्ह अहवाल...... 99
अहवाल अप्राप्त ........ 10

जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून सोमवारी (ता.18) चार स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. तसेच रविवारी (ता.17) सहा नमुने तपासणीसाठी पाठविले होते. असे एकूण 10 नमुन्यांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहेत. तसेच उपचार घेत असलेली एक कोरोना बाधित महिलेची प्रकृती चांगली आहे.
-डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा शल्यचिकित्सक वाशीम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT