washim there Will there way; The chains of unity that the villagers made when the humanity was locked up in the lockdown 
विदर्भ

इच्छा तेथे मार्ग; लॉकडाउनमध्ये माणूसपण कुलुपबंद झाले असताना गावकऱ्यांनी केल्या एकीच्या साखळ्या मजबूत

राम चौधरी

वाशीम: कोरोनामुळे संपूर्ण जग हवालदिल झाले आहे. कामदार बेकार झाले तर काम देणारे घरात बसले. गावखेड्यापासून महानगरापर्यंत क्रियशक्ती थांबली असतांना वाशीम जिल्ह्यातील कळंबा महाली येथील शेतकर्यांनी मात्र हा लाॅकडाऊनचा काळ गावाच्या गावपण जपण्यात घालविला आहे.

कोणतीही सरकारी मदत न घेता गावकर्यांनी श्रमदानातून तीन किलोमीटर लांबीचा पाणंदरस्ता बनविला आहे.एकीकडे लाॅकडाऊन ने  माणूसपणच कुलूपबंद झाले असताना गावकर्यांनी्यां मात्र सहकार्यांने एकीच्या साखळ्या मजबूत केल्या आहेत.  


संचारबंदी व लाॅकडाऊन ने व्यवहारचक्र थांबले आहे. उद्योग बंद पडले, हाताला काम नसल्याने कामगार बेकार झाले. शहरापासून गावखेड्यापर्यंत माणूस घरबंद झाला आहे. मात्र वारकरी संप्रदायाचा वारसा असलेले कळंबा महाली हे गाव दखलपात्र ठरले आहे. कळंबा महाली हे वाशीम तालूक्यातील तसे सधन गाव. पुस नदीने गावाचा शिवार काळा कसदार केला आहे. हीच काळी माती पावसाळ्यात शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत होती.

कळंबा महाली ते ब्राम्हणवाडा परिवारातील जुन्या पाणंद रस्त्यावर पावसाळ्यात प्रचंड चिखल व्हायचा शेती कसण्यासाठी हा चिखल तुडवत जाण्याशिवाय पर्याय नव्हता.

ग्रामपंचायत पंचायत समितीत अनेकवेळा मागणी करूनही हा रस्ता कायम चिखलात बरबटलेलाच राहीला. मात्र कोरोनाचे संकट आले. गावकरी घरबंद झाले. पारावरच्या गप्पातून रस्त्याचा विषय निघाला गावातील महादेव महाले, हनुमान शिंदे, गजानन महाले, रामकृष्ण महाले, भगवान ठाकरे, बाळू महाले, महादेव महाले, शुभम गायकवाड, गिरीष गायकवाड, किशोर गायकवाड, प्रकाश महाले, मुन्ना महाले, संजय महाले, चेतन महाले, नितीन कांबळे, पांडुरंग महाले, ज्ञानेश्वर महाले, ज्ञानेश्वर शिंदे, जेसीबी मालक देवराव महाले, डाॅ. भागवत महाले, बंडू महाले, केशव महाले, हनुमान शिंदे, भाऊराव महाले, सुरेश शिंदे, दत्तात्रय महाले, बंडू उखळकर, मनोज कांबळे, महादेव महाले, शमीर पठाण, शब्बीर सय्यद, सद्दाम पठाण, नंदू महाले, देवीदास ठाकरे, विकास महाले, नागेश राऊत, हरिभाऊ महाले, कैलास महाले, विठ्ठल महाले, कृष्णा महाले, गणेश महाले, दत्ता चिखलकर, प्रकाश महाले, रवी महाले, पांडुरंग महाले, नितीन महाले, दत्ता महाले, रामहारी महाले, किसन महाले, विजय महाले, अनिल खासबागे, हरिभाऊ गायकवाड, विजय वैद्य, गजानन महाले, बाजीराव महाले, बाबूलाल महाले, गजानन महाले, सागर कांबळे, अनिल कांबळे, गणेश महाले, शांतीराम महाले, सोपन शेजुळे, महादू महाले  यांनी एकत्र येऊन कळंबा ते ब्राम्हणवाडा हा तब्बल तीन किलोमीटरचा पाणंद रस्ता एकमेकांच्या सहकार्याने पंधरा दिवसांत पूर्ण केला. यामध्ये ट्रॅक्टर मालक शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर मोफत दिले. जेसीबीच्या मालकांनी जेसीबी मोफत दिली. तर इतर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरद्वारे आणलेला मुरूम या पाणंद रस्त्यावर पसरवून दिला. गावकऱ्यांच्या या सहकार्याने लाॅकडाऊनची बंधनेही सहकार्याच्या साखळीत गुंफली गेली.      

शिवार आले रस्त्यावर
कळंबा महाली ते ब्राम्हणवाडा या दरम्यानच्या तीन किलोमीटरचे शिवार पावसाळ्यात चार महिने चिखलमय राहत असे. शेतातील माल घरी आणण्यासाठीही चार महिने वाट पहावी लागत असे. शेतात जाण्यासाठी गुडघाभर चिखलातून मार्ग काढत जावे लागायचे. मात्र, आता हे शिवारच रस्त्यावर आले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

बाहुबली: द बिगिनिंगला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत, आता बाहुबली: द एपिक रिलीज होणार 'या' तारखेला !

Success Story: पेंडकापारचा ‘आशीर्वाद’ चमकला शिकागोमध्ये; प्रतिकूल परिस्थितीवर केली मात बेला परिसरात कौतुक

Thane Rickshaw Driver Girl Video: भाडे नाकारले, हात उचलला, ठाण्यात रिक्षाचालकाची मुजोरी | Sakal News

SCROLL FOR NEXT