संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

मोकळ्या भूखंडांवर पाणी, मालकांना ठोठावणार दंड

सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः पाणी साचलेल्या मोकळ्या भूखंडधारकांना नोटीस बजावण्याचे तसेच दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी आज दिले. व्हॉट्‌सऍपद्वारे डेंगीबाबत जनजागृती करणारे संदेश नागरिकांना पाठविण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
महापालिकेत आरोग्य समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीत उपसभापती नागेश सहारे, समिती सदस्य लहूकुमार बेहेते, लीला हाथीबेड, विशाखा बांते, सरिता कावरे, कमलेश चौधरी, आशा नेहरू उईके, संजय बुर्रेवार, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे, स्वच्छ भारत अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे यांच्यासह सर्व झोनल अधिकारी व स्वास्थ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. कीटकजन्य आजारांवर व डेंगीवर उपाययोजनासंबंधी यावेळी चर्चा करण्यात आली. डॉ. भावना सोनकुसळे यांनी डेंगीच्या नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत माहिती दिली. डेंगीसदृश रुग्ण आढळल्यास त्या परिसरात फवारणी करण्यात येते. शहरातील 624 नोंदणीकृत खासगी दवाखाने आहे. या दवाखान्यातही डेंगीसदृश रुग्ण आढळल्यास त्याची नोंदणी महानगरपालिकेद्वारे करण्यात येते. शहरात आतापर्यंत 194 डेंगीसदृश रुग्ण आढळल्याचे त्यांनी सांगितले. मोकळ्या ठिकाणी पाणी साचून राहता कामा नये, याची दक्षता घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मोकळ्या भूखंडावरही पाणी साचता कामा नये, याकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावर पाणी साचलेल्या भूखंडांसाठी मालकांना नोटीस बजावण्याचे तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले. यावेळी स्वच्छ सर्वेक्षण 2020 बद्दलही बैठकीत चर्चा करण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षणाकरिता स्वच्छता ऍप डाउनलोड करण्यासाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद येत असल्याचे स्वच्छ भारत अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT