Kishor Tiwari Kishor Tiwari
विदर्भ

महाराष्ट्रात ओला दुष्काळ; किशोर तिवारी यांची मदतीची मागणी

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : सप्टेंबर महिन्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. सततच्या पावसाने महाराष्ट्रात ओला दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली असून सुमारे ८० लाख हेक्टरवरील कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, धानासह इतर पिके बुडाली आहेत. शेतकरी हवालदिल झाले असून त्यांना केंद्र व राज्य शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी देशाचे पंतप्रधान व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वस्तुस्थिती कळविली आहे.

महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खांदेश व उत्तर महाराष्ट्रातील ८० लाख हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी, धान, मूग व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्यातील सुमारे ५० लाख शेतकऱ्‍यांचे कमीतकमी ३० हजार कोटींचे नुकसान झाले आहे. सर्व पीकविमा कंपन्या, कृषी, महसूल व ग्रामीण विकास यंत्रणाचे कर्मचारी कुठेच सर्वेक्षण करताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्येसाठी प्रवृत्त होत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओल्या दुष्काळाचा विषय गांभीर्याने घेऊन संकटात सापडलेल्या शेतकऱ्‍यांना दिलासा यावा, अशी मागणी वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे. केंद्र सरकारने तत्काळ ३० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे, असेही त्यांनी पत्रात उल्लेख केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar MP Accident : खासदार हेमंत सावरा भीषण अपघातातून थोडक्यात बचावले, डंपरने गाडीला धडक दिली अन्...

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र देशात अव्वल!

Gold Silver Rates : सोने दरात किरकोळ तर चांदीच्या दरात सलग तीन दिवस मोठी घसरण; आजचा भाव किती?

Petrol Price Today : पेट्रोल-डिझेलचे नवे रेट जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे आजचा ताजा दर ?

Chhatrapati Sambhajinagar: आर्थिक वादातून तरुणाचा जीव घेतला ; तीन आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT