गांधीबाग ः पीओपी मूर्तीमागील लाल खूण तपासताना मनपाचे अधिकारी व उपद्रव शोध पथकातील अधिकारी.  
विदर्भ

हे काय? पीओपी मूर्तींवर लाल खूणच नाही

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पीओपीची मूर्ती असल्यास विक्रेत्यांना त्यामागे लाल खूण करणे बंधनकारक आहे. मात्र, शहरातील मूर्ती विक्रेत्यांकडून सर्रासपणे पीओपी मूर्ती विक्रीबाबतच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे माती व पीओपी मूर्तीतील फरकाबाबत अनभिज्ञ असलेल्या नागरिकांची फसवणूक होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. मातीच्या मूर्तीच्या नावावर पीओपी मूर्तींची विक्री होत असल्याची शंकाही बळावली आहे.
शहरात गणेशोत्सवाची तयारी सुरू आहे. विविध भागातील बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती विक्री व प्रदर्शन लावले आहे. महापालिकेने पीओपी मूर्ती व मातीच्या मूर्ती विक्रेत्यांना दुकानांसाठी जागा दिल्या आहेत. झोनस्तरावर परवानेही देण्यात आले. त्यामुळे मूर्ती विक्रेत्यांनी दुकाने थाटली. परंतु, महापालिकेने पीओपी मूर्ती विक्रीसाठी काही नियम व अटी लागू केल्या आहेत. त्यानुसार दुकानदारांना पीओपी मूर्तीच्या मागे लाल रंगाची खूण करणे तसेच दुकानात पीओपी मूर्ती विक्रीसंबंधी फलक लावणे अनिवार्य आहे. मात्र, दुकानदारांनी या अटी व शर्तीला केराची टोपली दाखवित महापालिकेलाच आव्हान दिल्याचे गुरुवारी धरमपेठ झोनने केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले.
धरमपेठ झोनचे झोनल अधिकारी दीनदयाल टेंबेकर व महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने 26 दुकानांची तपासणी केली. यात अनेक दुकानदारांनी पीओपी मूर्ती मागे लाल रंगाची खूण केली नसल्याचे तसेच विक्रीचा फलकही लावला नसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पीओपी व मातीच्या मूर्तीतील फरकाबाबत अनभिज्ञ भक्तांची फसवणूक होत असल्याचेही दिसून येत आहे. या दुकानदारांकडून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 12 हजारांचा दंड वसूल केला. तसेच धरमपेठ, गांधीबाग झोन, नेहरूनगर, हनुमाननगर, मंगळवारी, आशीनगर, सतरंजीपुरा, लकडगंज, लक्ष्मीनगर, धंतोली झोनमध्ये कारवाई सुरू करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT