file photo
file photo 
विदर्भ

विदर्भातील सिंचन प्रकल्प केव्हापर्यंत पूर्ण होणार?

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विदर्भातील सिंचन प्रकल्पांचे बांधकाम केव्हापर्यंत पूर्ण होतील, आतापर्यंत किती काम पूर्ण झाले आणि किती बाकी आहे. यांसदर्भात सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) प्रतिज्ञापत्र दाखल करून 24 सिंचन प्रकल्पांमध्ये विविध निविदा प्रक्रिया व बांधकामातील भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असल्याची माहिती दिली.
सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी जनमंच या स्वयंसेवी संस्थेने जनहित याचिका दाखल केली. तर, अमरावती विभागातील बाजोरिया कन्स्ट्रक्‍शनला मिळालेल्या कंत्राटांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते अतुल जगताप यांचीही याचिका आहे. या याचिकांवर सुनावणी झाली. त्यावेळी मेसर्स बाजोरिया कन्स्ट्रक्‍शनला जिगाव, निम्न पेढी, रायगड आणि वाघाडी सिंचन प्रकल्पांचे कंत्राट मिळाले. त्यासंदर्भात अतिरिक्त पोलिस महासंचालक बिपीनकुमार सिंग यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या विकासाला अनुसरून बुधवारी न्या. सुनील शुक्रे आणि न्या. श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने विदर्भातील सिंचन प्रकल्पांचे बांधकाम व विकास कुठपर्यंत झाला, याबाबत 16 सप्टेंबपर्यंत सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तसेच सर्व याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतल्या. जनमंचतर्फे ऍड. फिरदोस मिर्झा, जगतापतर्फे ऍड. श्रीधर पुरोहित आणि राज्य सरकारतर्फे वरिष्ठ अधिवक्ता आनंद जयस्वाल यांनी बाजू मांडली.
सरकारकडे 18 प्रकरणे प्रलंबित
18 प्रकरणांचा तपास पूर्ण झाला असून त्यात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव प्रलंबित आहेत. चार गुन्ह्यांचा तपास अंतिम टप्प्यात आहे. सात प्रकरणांची चौकशी करण्यात आली असता त्यात कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार न आढळल्याने प्रकरण बंद करण्यात आले. एका खटल्यात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ठोस पुरावे नसल्याने ते प्रकरण बंद करण्यासाठी न्यायालयात अहवाल सादर केला आहे. पाच प्रकल्पांच्या गैरव्यवहाराचा तपास अद्याप सुरू व्हायचा आहे.

16 प्रकल्पातील 262 निविदांची चौकशी
एसआयटीकडून विदर्भातील 16 सिंचन प्रकल्पांतर्गत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात येत असून गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत 1 ते 25 कोटींच्या जवळपास 155 निविदांची चौकशी करण्यात आली. तर, उर्वरित प्रकल्पांमधील 107 निविदांची चौकशी करण्यात आली. तीन प्रकल्पांमधील निविदांची चौकशी पूर्ण झाली असून इतर प्रकल्पांमधील निविदांची चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालकांच्या कार्यालयातून अनेक दस्तावेज मिळवण्यात आले. त्यापैकी अनेक कंत्राटदारांनी सादर केलेले अनुभव प्रमाणपत्र आसाम, दिल्ली, राजस्थान, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यातील आहेत. हे दस्तावेज खूप असल्याने त्यांच्या चौकशीसाठी वेळ लागणार आहे. अमरावती विभागातील चार प्रकल्पांची चौकशी सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT