Rave-Party
Rave-Party 
विदर्भ

रेव्ह पार्टीचा आयोजक कोण?

सकाळवृत्तसेवा

कळमेश्‍वर - गौंडखैरी बरड येथील रेव्ह पार्टीमध्ये सामील झालेल्या युवतींचा संबंध उत्तर प्रदेशातील अलाहाबाद व महाराष्ट्रातील सोलापूरशी असल्याने अनेक प्रश्‍न उपस्थित आहेत. त्यांचा संबध देहविक्रयाशी होता काय? या ठिकाणी स्वाइप मशीनचा वापर कोणत्या उद्देशाने करण्यात आला, याबद्दलही शंका व्यक्त केली जात असतानाच या पार्टीचा आयोजक कोण, याचाही खुलासा अद्याप झालेला नाही. 

पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीनंतर छापा मारला, त्यावेळी युवक-युवती मद्याच्या नशेत झिंगलेल्या अवस्थेत नृत्य करीत होते. याच बंगल्यात एका बाजूला डिस्कोथेक व रंगीत लायटिंग लावलेली होती. या ठिकाणाहून पोलिसांनी जप्त केलेल्या साहित्यात विदेशी मद्य, हुक्का पॉट व स्वाइप मशीन यासह नृत्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. ताब्यात घेण्यात आलेली महिला स्वयंपाकीण होती, अशी माहिती मिळाली आहे. मात्र अन्य युवती एका डान्स पार्टीच्या सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या कारवाईने अनेक प्रश्‍न उपस्थित केले आहेत.

या प्रकरणी अटकेतील आरोपींना जामीन मिळाला आहे. ज्या बंगल्यात ही पार्टी सुरू होती त्या मालकास अद्याप अटक झालेली नाही. पोलिसांनी जप्त केलेल्या रकमेचा आकडाही जाहीर केलेला नाही. पोलिसांनी मुंबई दारूबंदी कायदा, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान विरोधातील कोप्ता कायदा व महाराष्ट्र पोलिस कायद्यातील नियमांच्या आधारावर केली आहे.

काहींच्या मते, रेव्ह पार्टीच! 
या प्रकरणाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सूत्रांनी सुरू असलेले नृत्य रेव्ह पार्टी सदृश असल्याची माहिती दिली, तर विशेष पथकाचे नेतृत्व करणारे एसडीपीओ विक्रम कदम यांनी रेव्ह पार्टी नसल्याचे सांगितले. तथापि, रेव्ह पार्टीत जप्त करण्यात आलेली उपकरणे वापरली जातात, असे मत पोलिस सूत्रांनी व्यक्त केले. याचमुळे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. 

पोलिसांनी जप्त केले सीसीटीव्ही फुटेज
कारवाईदरम्यान पोलिसांनी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत. यात युवती अर्धनग्न अवस्थेत नृत्य करीत आहेत. सिगरेटचे झुरके एकमेकांना देत असल्याचे दिसून येते. एकमेकांसोबत डान्स करीत असताना अश्‍लील चाळे करीत असल्याचे या फुटेजमध्ये दिसत आहे. मात्र, युवतींचा संबंध डान्सपार्टीपुरताच होता किंवा नाही याचा खुलासा अद्याप बाकी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत पवारांना पाहण्यासाठी गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली आहे

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: एकाच ओव्हरमध्ये चेन्नईला जबरदस्त दुहेरी धक्का! रहाणेपाठोपाठ शिवम दुबे 'गोल्डन डक'वर बाद

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

SCROLL FOR NEXT