file photo
file photo 
विदर्भ

Vidhan Sabha 2019 :हलबा, मुस्लिमांची नाराजी कोणाला भोवणार? 

राजेश चरपे

नागपूर : मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार तसेच युवा नेते बंटी शेळके यांनी जोरदार हवा निर्माण केली असली तरी मुस्लिम आणि हलबा समाजातील नाराजी त्यांना मारक ठरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. भाजपचे उमेदवार आमदार विकास कुंभारे यांच्या पथ्यावर ही पडल्याचे सध्यातरी दिसून येते आहे. दुसरीकडे कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार रमेश पुणेकर यांनी माघार घेतल्याचा फायदाही त्यांना होऊ शकतो. 
मध्य नागपूर मुस्लिम व हलबाबहुल मतदारसंघ आहे. कॉंग्रेसचे अनीस अहदम यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, यंदा कॉंग्रेसने मुस्लिम समाजाला जिल्ह्यात एकही जागा दिली नाही. त्यामुळे हा समाज कॉंग्रेसवर नाराज आहे. दोनच दिवसांपूर्वी शहर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष शेख हुसेन यांनी राहुल गांधी यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. मुस्लिम समाज कॉंग्रेसचा पारंपरिक मतदार आहे. येथे एमआयएमने मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली आहे. कॉंग्रेसची मते एमआयएमकडे वळल्यास शेळके यांना फटका बसू शकतो. मराठा आणि ओबीसींच्या मतांवरच आता शेळके यांची मदार आहे. 
घोषणा केल्यानंतरही हलबांना आरक्षण दिले नसल्याने समाज भाजपवर नाराज आहे. अनेक दिवसांपासून ते आपला असंतोष व्यक्त करीत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान आंदोलन चांगलेच पेटले होते. मात्र, नितीन गडकरी यांना ते शांत करण्यात यश आले. या दरम्यान अनेक नेते कॉंग्रेसकडे गेले. समाजाच्या आंदोलक नेत्या ऍड. नंदा पराते यांनी थेट दिल्लीत जाऊन कॉंग्रेस प्रवेश घेतला होता. उमेदवारी मिळेल या हिशेबाने त्यांनी कार्यक्रमांची आखणीसुद्धा केली होती. प्रवेशानंतर त्यांची फारशी दखल पक्षाने घेतली नाही. त्याही आता दिसेनाशा झाल्या आहेत. कॉंग्रेसने उमेदवारी दिली नसल्याने हलबासुद्धा पक्षावर नाराज आहे. 
आमदार विकास कुंभारे यांच्या कामगिरीवर भाजपचे नेते फारसे खुश नसले तरी त्यांनाच उमेदवारी देण्यात आली. येथून शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रवीण दटके इच्छुक होते. पक्षांतर्गत सर्वेत ते आघाडीवर होते. मात्र, हलबा नाराज होऊ नये याची काळजी भाजपने घेतली. हलबा समाजात गल्लोगल्ली नेते आहेत. कॉंग्रेसच्या तुलनेत भाजपने त्यांना महापालिकेच चांगले स्थान दिले आहे. याचा फायदा कुंभारे यांना होणार आहे. कॉंग्रेसकडे उमेदवारी मागणारे हलबा समाजाचे कमलेश भगतकर यांनी वंचित आघाडीचा झेंडा हाती घेतला आहे. सुरुवातीला त्यांच्यात दिसणारी धडाडी प्रचारात दिसत नाही. ते कुंभारे यांची फार मते खेचू शकतील अशी सध्याची स्थिती नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT