file photo file photo
विदर्भ

शारीरिक संबंधास नकार; पतीने कुऱ्हाडीने केला पत्नीचा खून

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : घरगुती कारणातून उद्भवलेल्या वादात कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीचा खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना घाटंजी तालुक्यातील पंगडी येथे रविवारी (ता. दहा) सकाळच्या सुमारास घडली. दीक्षा संतोष ठाकरे (वय ३०, रा. पंगडी) असे मृत महिलेचे नाव आहे. तर संतोष ठाकरे (वय ३५, रा. पंगडी) असे संशयित आरोपी पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीने शनिवारी रात्री पत्नीकडे शारीरिक सुखाची मागणी केली. मात्र, महिलेने नकार दिला. रविवारी सकाळी पतीने पुन्हा ‘शारीरिक सुख देत नाही, अपमानजनक बोलते’ असे म्हणत वाद घातला. राग अनावर झाल्याने पत्नीच्या मानेवर, डोक्यावर कुऱ्हाडीने घाव घातले. यात विवाहितेचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती पतीनेच घाटंजी पोलिसांना दिली. शारीरिक संबंधास नकार दिल्याने घात केल्याची कबुली पती संतोष ठाकरे याने पोलिसांत दिली. महिलेला सात वर्षांची मुलगी व पाच वर्षांचा मुलगा आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी भेट दिली.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पत्नीच्या खूनप्रकरणी संतोषविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास घाटंजी पोलिस ठाण्याचे ठाणेदार मनीष दिवटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक किशोर भुजाडे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nvidia Share Crash: एनव्हीडियाचा शेअर कोसळल्याने १३ भारतीय म्युच्युअल फंड अडचणीत? तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?

Marathwada Drought Relief : भीषण दुष्काळात बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू! 'या' मोठ्या धरणातून दोन्ही कालव्यांत पाणी सोडले, रब्बी पिकांना मिळणार जीवदान!

Job Alert: केंद्र सरकारच्या 'या' विभागात १,३९३ जागांची मेगा भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची तारीख

पंतप्रधान मोदींच्या नावाने ऑनलाईन फ्रॉड; एका मेसेजमुळे बँक खातं होऊ शकतं रिकामं, नेमका विषय काय?

Latest Marathi News Live Update: साम पित्रोदांकडून मोदींचे कौतुक; भाजपमध्ये प्रवेश करणार का? काँग्रेस नेत्याने दिले स्पष्ट उत्तर

SCROLL FOR NEXT