कामठी - मातीचे माठ तयार करताना कुंभार.
कामठी - मातीचे माठ तयार करताना कुंभार. 
विदर्भ

कुंभारांचा व्यवसाय बंद होणार का?

बंडू नारनवरे

कामठी - थंड पाण्यासाठी बहुतांश जण आजही पारंपरिक माठांना पसंती देत असल्याने बाजारात मातीच्या माठांची मागणी कायम आहे. मात्र, गौण खनिजाचे सरकारी नियम, महागाई व आधुनिकता यामुळे कुंभाराच्या या व्यवसाय बंद होणार का? असा प्रश्‍न स्वत: कुंभार समाजातून केला जात आहे. 

बदलत्या काळानुसार थंडगार पाण्यासाठी वापरात येणाऱ्या माठाची जागा बॉटलबंद मिनरल वॉटरने घेतली आहे. त्यामुळे कुंभार व्यवसायावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. शहरात अनेक ठिकाणी निरनिराळ्या आकारातील माठ विक्रीसाठी आले आहेत. दुसरीकडे माठ तयार करण्याचा व्यवसाय आता पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे दुःख या व्यवसायात पिढ्यान्‌पिढ्या गुंतून असलेले कमसरी बाजार येथील रूपेश प्रजापती यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, कमसरी बाजार हा माठ तयार करण्याकरिता प्रसिद्ध होता. पण, आज या व्यवसायाने आमची कंबरच तोडली आहे. माती सहजासहजी मिळत नाही. यात सरकारी नियम आता कडक झाले आहेत.

आंधळगाव व सावरगाव येथून माती विकत हजारो खर्च करावे लागतात. एका मिनीट्रकमध्ये आलेल्या मातीत ५० माठ तयार होतात. गतवर्षीच्या तुलनेत माठांच्या किमतीमध्ये किरकोळ वाढ झाली असून पारंपरिक लाल रंगाच्या माठाला जास्त मागणी आहे. तर नळ असलेल्या माठांना मध्यमवर्गीय लोकांची विशेष पसंती आहे. साधारण ५० रुपयांपासून तर २०० रु. किमतीपर्यंत माठ बाजारात उपलब्ध आहेत.

अडचणी व वाढलेल्या खर्चामुळे बहुतेक कुंभारांनी व्यवसाय बंद करून मोलमजुरी सुरू केली आहे. तीन पिढ्यांपासून आम्ही या व्यवसायात असल्याने दुसरे कामही जमत नाही. या कामाला नवी पिढी दूर सारू लागली आहे.
- रूपेश प्रजापती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

SCROLL FOR NEXT