नागपूर : डम्पिंग यार्डमध्ये बायोमाईनिंग प्रकल्पाची माहिती घेताना आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी व उपमहापौर दीपराज पार्डीकर.
नागपूर : डम्पिंग यार्डमध्ये बायोमाईनिंग प्रकल्पाची माहिती घेताना आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी व उपमहापौर दीपराज पार्डीकर.  
विदर्भ

पदभार न घेताच आरोग्यसभापती डम्पिंग यार्डवर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सभापतिपदाची निवडणूक जिंकल्यानंतर पदभार स्वीकारण्याची प्रतीक्षा न करता आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी डम्पिंग यार्डची पाहणी केली. कचऱ्यावर प्रक्रियेची माहिती घेत बायोमाईनिंग पद्धतीने कचरा प्रक्रियेला वेग देण्याचे निर्देश दिले.
शनिवारी दहाही विशेष समिती सभापतींची निवडणूक पार पडली. आरोग्य समिती सभापती म्हणून वीरेंद्र कुकरेजा बिनविरोध निवडून आले. सोमवारी दहाही विशेष समिती सभापती पदग्रहण करतील. मात्र, पदग्रहणाची प्रतीक्षा न करता कुकरेजा यांनी शनिवारी थेट भांडेवाडी येथील डम्पिंग यार्ड गाठले. त्यांच्यासमवेत उपमहापौर दीपराज पार्डीकर, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मनपा स्वच्छ भारत मिशनचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, पशुचिकित्सक अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले होते.
डम्पिंग यार्डमधील कचऱ्यावर बायोमाईनिंगद्वारे प्रक्रिया करण्यात येत आहे. याशिवाय कचऱ्यातून वीजनिर्मिती प्रकल्पही रखडला आहे. भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता यावर प्रतिबंध घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती उपमहापौर दीपराज पार्डीकर व आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी घेतली. भांडेवाडी येथे घनकचऱ्याचे बायोमायनिंग प्रकल्पाचे काम सुरू आहे. या कामाच्या प्रगतीचा आढावाही त्यांनी घेतला. प्रकल्पाचे दीपक पाटील यांच्याकडून विस्तृत माहिती घेऊन कामात येणाऱ्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT