यवतमाळ : मजुरांअभावी कापूस वेचणी रखडली; शेतकऱ्यांची झाली कोंडी sakal
विदर्भ

यवतमाळ : मजुरांअभावी कापूस वेचणी रखडली; शेतकऱ्यांची झाली कोंडी

कापसाला आठ ते साडेआठ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असताना मजुरांअभावी कापूस वेचणी रखडली आहे.

रवींद्र शिंदे

यवतमाळ : दोन महिन्यांपर्यंत अतिवृष्टीत शेतपिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले होते. आता मात्र, कापसाला आठ ते साडेआठ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असताना मजुरांअभावी कापूस वेचणी रखडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकर्‍यांची कोंडी झाल्याचे चित्र जिल्हाभरात पाहावयास मिळत आहे.

विविध अडचणींचा सामना करणे जणू काही शेतकर्‍यांच्या नशिबातच असते. दरवर्षीच शेतकरी कधी नैसर्गिक तर कधी शासनाच्या दुर्लक्षित धोरणांमुळे अडचणींत येतात. यंदाच्या हंगामात सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने पेरणी व लागवडीची कामे अगदी वेळेवर झाल्याने शेतकरी समाधानी दिसत होते. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिकांची उगवण न झाल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली.

त्यानंतर मात्र, पावसाने समाधानकारक हजेरी लावली व त्यामुळे पिकांची स्थितीही उत्तम झाली. म्हणून चांगले उत्पादन मिळेल, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांवर मात्र, हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीने मोठे आर्थिक संकटच कोसळले. अतिपावसामुळे कापूस, सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे निसर्गाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासच हिरावून नेला.

अशा प्रकारे मोठ्या आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकर्‍यांच्या कापसाला आठ ते साडेआठ हजार रुपये भाव मिळत असल्याने काही प्रमाणात दिलासा वाटत आहे. मात्र, एकाच वेळी सर्वच ठिकाणी कापूस वेचणी सुरू असल्याने मजुरांच्या टंचाईचा सामना कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सध्या करावा लागत आहे. ‘येता का कापूस वेचणीला?’ अशा प्रकारची विनवणी करण्याची वेळ आली असून, मजुरांअभावी कापूस वेचणी रखडल्याने शेतकऱ्यांची पुन्हा कोंडी झालेली पाहावयास मिळत आहे.

"दिवाळी आता संपायला आली. परंतु, कापूस शेतातच असल्याने शेतकर्‍यांनी दिवाळी घरी साजरी केली नाही. कारण सध्या कापसाला आठ ते नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. मात्र, कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने कापूस घरात येण्यात अडचणी येत आहेत. सध्या एक मन म्हणजे 20 किलो कापूस वेचल्यास 170 ते 200 रुपये वेचाई दिले जात आहे. मात्र, मजुरांसाठी आपल्या गावासह परिसरातील गावांत जाऊन विनवणी करावी लागत आहे. तरीदेखील मजूर मिळत नसल्याने सध्यातरी मोठी कोंडी झाली आहे."

- प्रेमदास सोमला चव्हाण, कापूस उत्पादक, शेतकरी, घटाना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: 16 चौकार, 9 षटकार... KL Rahulचे दीडशतक! १९ वर्षात कोणत्याच भारतीयाला न जमकलेला पराक्रम, Orange Cap ही मिळवली

Junnar Association: जुन्नर शिवनेर खते-बियाणे औषध विक्रेते असोसिएशन अध्यक्षपदी प्रवेश देवकर यांची बिनविरोध निवड

Gautam Adani: गौतम अदानींच्या संपत्तीत जबरदस्त उसळी! 100 अब्ज डॉलर क्लबमध्ये एन्ट्री; 'या' उद्योगपतीला दिली टक्कर

IPL 2026, RR vs SRH: सनरायझर्स हैदराबादने अचानक कर्णधार बदलला! नवा कॅप्टन टॉस जिंकून ईशान किशनबद्दल काय म्हणाला?

Police Recruitment : जुन्नरच्या अतिदुर्गम देवळे गावातील शेतकरी कुटुंबातील वैशाली शेळकेची पिंपरी-चिंचवड पोलिस दलात निवड

SCROLL FOR NEXT