विजेचा धक्का लागून आजी, आजोबासह नातवाचा मृत्यू sakal
विदर्भ

यवतमाळ : विजेचा धक्का लागून आजी, आजोबासह नातवाचा मृत्यू

तालुक्यातील डोल्हारी येथे मारोतराव सुरदसे यांचे घनापूर रस्त्यावर शेत आहे.

सकाळ वृत्तसेवा

दारव्हा (जि. यवतमाळ) : तालुक्यातील डोल्हारी येथे शेतात विजेचा धक्का लागून आजी, आजोबासह नातवाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (ता. ५) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे डोल्हारी परिसरात शोककळा पसरली आहे. मारोतराव सुरदसे (वय ७०), पत्नी मनकर्णाबाई सुरदसे (वय ६५) आणि त्यांचा नातू सुमित विनोद सुरदसे (वय १६) अशी एकाच कुटुंबातील मृतांची नावे आहेत.

तालुक्यातील डोल्हारी येथे मारोतराव सुरदसे यांचे घनापूर रस्त्यावर शेत आहे. शेतामध्ये त्यांनी हरभऱ्‍याची पेरणी केली. पिकाला पाणी देण्यासाठी सकाळी शेतात तिघे जण गेले होते. शेतातील लाइटजवळ मारोतराव यांना विजेचा धक्का लागल्याने ते जागीच कोसळले. त्यांना वाचविण्यासाठी पत्नी मनकर्णाबाई यांनी धाव घेतली. मात्र, त्यांनाही विजेचा धक्का लागला. आजी-आजोबांना जमिनीवर पडलेले पाहून शेतात असलेला नातू सुमित हा त्यांच्याकडे धावला. तेव्हा त्यालाही विजेचा जोरदार धक्का लागला.

मन हेलावून टाकणाऱ्‍या या घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी दारव्हा पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून मृत्यूची नोंद घेतली. तिघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील केमिकल कारखान्यात भीषण स्फोट; २ किमी परिसर हादरला

कमळीचे रिअर लाईफ वडिल पाहिलेत का? लेक दिसते सेम टू सेम आई सारखी, वडिलांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम एकत्र पोहचलं कुटुंब

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT