Yavatmal Superintendent of Police gives a helping hand to the patient
Yavatmal Superintendent of Police gives a helping hand to the patient 
विदर्भ

सूर्य आग ओकत असताना ते उठत, बसत, पाणी पीत चालले होते, मग...

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : पोटाचा त्रास होत असल्याने रुग्णाला डॉक्‍टरांनी यवतमाळला जाण्याचा सल्ला दिला. लॉकडाउनमुळे वाहन नसल्याने रुग्णाने पायीच यवतमाळच्या दिशेने प्रवास सुरू केला. दोन दिवसांपासून उपाशी असलेल्या रुग्णाला यवतमाळ शहरानजीक एक वाहन येताना दिसले. आपल्याला काही मदत मिळावी, हीच त्याची अपेक्षा. त्या वाहनातून चक्क पोलिस अधीक्षक एम. राजकुमार उतरले आणि रुग्णाची विचारपूस केली. पेट्रोलिंगवर असलेल्या कर्मचाऱ्यास सदर रुग्णाला वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यास सांगितले. 

दिग्रस तालुक्‍यातील झिरपूरवाडी येथील कृष्णा टोंगळे या व्यक्तीला पोटाचा त्रास असल्याने त्यांनी दिग्रस येथील डॉक्‍टरला दाखविले. वेदना जास्त असल्याने डॉक्‍टरांनी यवतमाळला जाण्याचा सल्ला दिला. मात्र, लॉकडाउनमुळे कुणाला घराबाहेर पडता येत नाही. वाहतुकीची सर्व साधने बंद आहेत. पोटात तीव्र वेदना होत असल्याने उपाशीपोटीच दोन दिवसांपूर्वी रुग्णाने दिग्रस येथून पायी प्रवासाला सुरुवात केली. 

सूर्य आग ओकत असल्याने चालणेही कठीण झाले. मार्गात वाहन दिसल्यास मदतीसाठी हात दाखविला. कुणीही असेल म्हणून दुर्लक्ष केले. उठत... बसत... पाणी पीत... रुग्ण कसाबसा यवतमाळ शहरातील वनवासी मारोती मंदिराजवळ पोहोचला. दरम्यान, त्याला एक वाहन येताना दिसले. रुग्णाने हात दाखवून वाहनाला हात दिला. त्यातून पोलिस अधीक्षक उतरले व रुग्णाला विचारपूस केली. 

पेट्रोलिंगवर असलेल्या जगदीश राठोड या कर्मचाऱ्यास थांबवून रुग्णास वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यास सांगितले. तत्पूर्वी, जेवण देण्यास सांगितले. पोलिस अधीक्षक यांच्यातील संवेदना बघून पोलिस कर्मचारी राठोड व रुग्ण टोंगळे दोघेही भावूक झाले. पोलिस कर्मचाऱ्याने रुग्णास भरती केल्यावर आपला मोबाईल क्रमांक दिला आणि काही अडचण असल्यास फोन करण्यास सांगितले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Soan Papdi: बाबा रामदेव यांना आणखी एक धक्का! पतंजलीची सोनपापडी निकृष्ट, तिघांना तुरुंगवास

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

SCROLL FOR NEXT