विदर्भ

विक्रमी ठरला यंदाचा हिवाळा

सकाळवृत्तसेवा

नागपूर - अंगाची लाहीलाही करणारा विदर्भातील कडक उन्हाळा आणि धो-धो बरसणारा विक्रमी पावसाळा सर्वांनाच परिचित आहे. मात्र, यावर्षी हिवाळ्यानेही वैदर्भींची चांगलीच परीक्षा घेतली. आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वांत थंड व दीर्घकाळ हिवाळ्याची नोंद यावर्षी हवामान विभागातर्फे करण्यात आली.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत उत्तर भारतातील जम्मू-काश्‍मीर, कुल्लू, मसुरी, दार्जिलिंगसह अन्य पहाडी भागांमध्ये सर्वाधिक बर्फवृष्टी झाली. त्यामुळे देशभर तब्बल १६ वेळा थंडीच्या लाटा आल्या. परिणामत: मैदानी भागांमध्ये गारठा वाढून कडाक्‍याची थंडी पडली. विदर्भातही कडाक्‍याच्या थंडीचा प्रभाव दिसून आला. किमान तापमानाने यावर्षी गेल्या शंभर वर्षांतील रेकॉर्ड मोडीत काढला. २९ डिसेंबरला नागपुरात नोंद झालेले ३.५ अंश सेल्सिअस तापमान शतकातील नीचांक ठरला. विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये पाऱ्याने नवनवीन नीचांक नोंदविले. उत्तर भारतात दीर्घकाळापासून सुरू असलेली बर्फवृष्टी लक्षात घेता विदर्भात लवकरच आणखी एक शीतलहर येण्याची दाट शक्‍यता आहे.

दरम्यान, विदर्भातील थंडीचा कडाका गुरुवारीही कायम राहिला. बुधवारच्या तुलनेत आज  नागपूरचा पारा (८ अंश सेल्सिअस) थोडाफार वाढला असला तरी, हवेतील गारठा कायम होता. सकाळी शहरात काही ठिकाणी दाट धुकेही पाहायला मिळाले. विदर्भात सर्वांत कमी तापमानाची नोंद गोंदिया येथे ७.४ अंश सेल्सिअस इतकी झाली. तर ब्रह्मपुरी येथेही पारा ९.३ अंशांवर राहिला. थंडीची लाट आणखी काही दिवस राहणार असून, त्यानंतर हळूहळू तापमानात वाढ होऊन पारा १५ अंशांपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT