विदर्भ

धारदार शस्त्राने भोसकून युवकाचा खून

सकाळवृत्तसेवा

नागपूर - अपघातात दुचाकीला झालेले नुकसानभरपाई देण्याच्या वादातून तिघांनी एका युवकाचा तलवार आणि चाकूने सपासप वार करून खून केला. ही थरारक घटना मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास नंदनवनमधील जय जलारामनगर, चामट चौकात घडली. 

राहुल शंकर खुबाडकर (२४, रा. महाभक्‍ती लेआउट, वाठोडा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. घटनेनंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून विशाल गजभिये आणि नितीन ठाकूर अशी आरोपींची नावे आहेत. तर एक आरोपी फरार आहे. 

प्राप्त माहितीनुसार, आरोपीच्या वाहनाशी राहुलच्या भावाच्या वाहनाचा अपघात झाला होता. त्याला दुखापतही झाली होती आणि वाहनाचे नुकसानही झाले होते. राहुल गाडीच्या नुकसानभरपाईसह उपचारासाठी पैसे मागत होता. रात्री ९ वाजताच्या सुमारास तो जलारामनगरमध्ये विशालची भेट घेण्यासाठी आला. येथे दोघांमध्ये भांडण झाले. भांडण विकोपाला गेल्यानंतर विशाल, नितीन आणि अज्ञात आरोपीने जवळील  चाकू आणि तलवारी काढून राहुलच्या पोटावर, छातीवर आणि हातावर सपासप वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. राहुल खाली कोसळताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. खून झाल्याची माहिती पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. 

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला. घटनेच्या अवघ्या काही वेळातच पोलिसांनी विशाल आणि नितीनला अटक केली. तर त्यांचा एक साथीदार घटनास्थळावरून फरार होण्यास यशस्वी झाला आहे. पोलिस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. क्षुल्लक कारणातून झालेल्या या हत्येने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT